मित्रांनो आपण पाचवी सहावी पासून Resistor विषयी विज्ञानात माहिती शिकत आलो आहोत. पण तरीही आपल्याला अजूनही Resistor बद्दल काहीच सांगता येत नाही. तुम्हालाच काय मला सुद्धा अनेक वेळेस काय सांगावे समजत नाही.


त्यामुळे मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण रेसिस्टर (Resistor) म्हणजे काय (What is resistor in marathi), रेसिस्टरचे (Resistor) वेगवेगळे प्रकार (Types of Resistor in Marathi), रेसिस्टर (Resistor) काय काम करतो (Working of Resistor in Marathi), रेसिस्टरचा (Resistor) उपयोग (Uses of Resistor in Marathi) काय आहे हे अगदी सोप्या आणि आपल्या मायबोलीत जाणून घेणार आहोत.



Resistor म्हणजे काय | Resistor चे वेगवेगळे प्रकार | What is resistor and types of resistor in Marathi 


रेसिस्टरचा (Resistor) शोध (History of Resistor in Marathi):

जर आपण Resistor च्या शोधाचा विचार केला तर Otis Boykin यांनी 1959 मध्ये Resistor चा शोध लावला.


रेसिस्टर (Resistor) म्हणजे काय (What is resistor in marathi):


What is Resistor in Marathi


Resistor ला मराठीत रोधक किंवा प्रतिरोधक असं सुद्धा म्हणतात. हे एक असं इलेक्ट्रिकल उपकरण आहे ज्याच्या मदतीने आपण करंट नियंत्रित करू शकतो. जर आपण Resistor ची व्याख्या बघितली तर त्यात तसचं सांगितलं आहे. Resistor एक असं इलेक्ट्रिकल उपकरण आहे, जे करंट वाहण्याचा वेग कमी करते. 



रेसिस्टरचे (Resistor) चिन्ह (Symbol of Resistor):

Resistor चे वेगवेगळे सिम्बॉल आपल्याला सर्किट मध्ये पाहायला मिळतात. पण जे मुख्य सिम्बॉल आहे ते हे आहे:



रेसिस्टर (Resistor) काम कसं करतो (Working of Resistor in Marathi):

याला समजणे खूप सोपे आहे. जर तुम्ही इलेक्ट्रिक क्षेत्रात असाल तर तुम्हाला याबद्दल माहित असेलच की काही पदार्थ असे असतात ज्यातून करंट वाहत नाही म्हणजे पुढे जाऊ शकत नाही. जसं की लाकूड असेल किंवा प्लास्टिक असेल.

परंतु काही पदार्थ असे असतात ज्यातून करंट वाहू शकतो. जसं की कॉपर असेल किंवा अल्युमिनियम असेल. यातून करंट अगदी सहजपणे वाहू शकतो, म्हणून वायर मध्ये कॉपर आणि अल्युमिनियमचा वापर करतात.

आता आपल्याला फक्त एवढच लक्ष्यात ठेवायचं आहे की ज्या पदार्थातून करंट वाहतो त्यांना कंडक्टर म्हणतात आणि ज्या पदार्थातून करंट वाहू शकत नाही त्यांना इंसुलेटर Insulator असे म्हणतात.

आता आपल्याला समजलं की कंडक्टर हा करंट वाहण्याचा एक रस्ता आहे, आणि जर आपण हा रस्ता खराब केला तर करंट वाहायला अडचणी येतात. आणि त्यामुळे करंटचा वेग कमी होतो. आणि हेच काम Resistor मध्ये केले जाते.


रेसिस्टरला (Resistor) कसे बनवले जाते (How to make resistor in Marathi):

Resistor बनवताना सर्वात पहिला एक कंडक्टर वायर घेतली जाते. जी आपल्याला resistor च्या दोन्ही बाजूला दिसते. परंतु या वायरला बरोबर मध्ये ब्रेक केलं जातं म्हणजे तोडल जातं. आणि त्या मधल्या जागेत कार्बन भरला जातो.

Resistor मध्ये कार्बन डायऑक्साइड भरल्याने करंट वाहण्यास अडचण निर्माण होते. आणि त्यामुळे करंट वाहण्याचा वेग कमी होतो. या पद्धतीने Resistor बनवला जातो.


रेसिस्टरचे (Resistor) कनेक्शन (Resistor Connections in Marathi):

1) Serial Connection
2) Parallel Connection


रेजिस्टेंस (Resistance) म्हणजे काय (What is resistance in Marathi):

मित्रांनो जेव्हा Resistor च नाव घेतलं जातं, तेव्हा Resistance च पण नाव घेतलं जातं. काही लोक तर Resistor लाच Resistance असं सुद्धा म्हणतात.
Resistance प्रत्येक वस्तूमध्ये असतो.

मित्रांनो तुम्ही हे लक्ष्यात ठेवा की कोणत्याही सर्किट (Circuit) मध्ये करंटला रोखणारा हा Resistance असतो.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की करंट ला resistor रोखतो की Resistance रोखतो?
मित्रांनो Resistor एका उपकरणाच नाव आहे. जसं की मोबाइल, टीव्ही याप्रमाणे Resistor सुधा एक उपकरण आहे. परंतु यामध्ये जो Resistance असतो तो करंट रोखतो.

तुम्हाला अनुभव आला असेल जेव्हा तुम्ही एखादा Resistor घेण्यासाठी एखाद्या स्टोअर मध्ये गेल्यानंतर आपल्याला तेथे विचारलं जातं की तुम्हाला किती Resistance चा Resistor पाहिजे? म्हणजेच Resistor एक उपकरण आहे आणि Resistance त्यामधील किंमत आहे.


ओहम काय आहे (What is ohm in Marathi):



मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलं की कंडक्टर (Conductor) च्यामध्ये कार्बन घातल्यानंतर तो Resistor बनतो.

परंतु मित्रानो आपल्याला किती करंट कमी करायचा आहे त्यावरून कार्बन किती घालायचा हे ठरवले जाते. म्हणजेच जर आपल्याला करंट ची मात्रा काही प्रमाणात कमी करायची असेल तर त्या ठिकाणी कमी Resistance चा Resistor वापरला जातो.

आणि हा जो Resistance आहे तो ओहम (ohm) मध्ये मोजला जातो. जर आपल्याला जास्त करंट सर्किट मध्ये कमी करायचा असेल तर आपण त्या ठिकाणी आपल्याला जास्त ओहम चा Resistor लावावा लागेल.

Resistance आणि Ohm मध्ये हाच फरक आहे की Resistance ची किंमत ओहम मध्ये मोजली जाते.


रेसिस्टर (Resistor) का लावतात (Why resistor are used in Marathi):

मित्रांनो आपल्या सर्व इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणाची काही ठराविक क्षमता असते, की जो जास्तीत जास्त किती करंटवर चालू शकतो. जर त्या उपकरणाच्या क्षमतेपेक्षा जास्त करंट त्या उपकरणातून गेला तर ते उपकरण खराब होऊ शकते.

समजा आपल्याकडे एखादा LED बल्ब आहे, आणि आपल्याला तो स्टार्ट करायचा आहे. तर आपण प्रथम हे पाहतो की तो बल्ब किती करंट आणि किती व्होल्टेज साठी बनलेला आहे. जर आपल्याकडील बॅटरी ची क्षमता LED च्या क्षमतेपेक्षा जास्त असेल तर आपण त्या दोन्हींमध्ये एक Resistor वापरू शकतो. त्यामुळे बॅटरी मधून वाहणारा जास्त करंट रोखला जाईल आणि LED बल्ब सहज चालू शकेल.


रेसिस्टरची (Resistor) व्याख्या (Defination of Resistor):

Resistor is an electrical component. That limits or regulates the flow of electrical current in an electronic circuit.

Resistor हे एक इलेक्ट्रिकलच असं उपकरण आहे जे इलेक्ट्रॉनिक सर्किट मधून वाहणाऱ्या करंटला नियंत्रित करते.


रेसिस्टरचे (Resistor) प्रकार (Types of Resistor in Marathi):

मित्रांनो Resistor चे दोन प्रकार पडतात.
1. Fix resistor (फिक्स रेसिस्टर)
2. Variable Resistor (वेरिएबल रेसिस्टर)


1. Fix resistor (फिक्स रेसिस्टर):

या प्रकारच्या Resistor चा Resistance आपण कमी किंवा जास्त करू शकत नाही. याचे आणखी नऊ उपप्रकार पडतात:
1) Carbon Composition Resistor
2) Wire Wound Resistor
3) Thin Film Resistor
4) Carbon Film Resistor
5) Metal Film Resistor
6) Thick Film Resistor
7) Metal Oxide Resistor
8) Cermet Oxide Resistor
9) Fusible Resistor


2. Variable Resistor (वेरिएबल रेसिस्टर):

या प्रकारच्या Resistor चा Resistance आपण कमी किंवा जास्त करू शकतो. याचे तीन उपप्रकार पडतात:
1) Potentiometer
2) Rheostats
3) Trimmers


रेसिस्टरची किंमत कशी ओळखावी (How to find resistor value in Marathi):

1. Multimeter च्या मदतीने
2. Color Code च्या मदतीने

Multimeter च्या मदतीने Resistor चा Resistance मोजणे खूप सोपे आहे. यासाठी आपल्याला Multimeter ला Ohm (ओहम) मध्ये सेट करावे लागेल. आणि Multimeter ची दोन्ही टोके Resistor ला जोडावी लागतील.

दुसऱ्या प्रकारात आपण Resistor वरील कलर कोड चा वापर करून Resistor चा Resistance मोजू शकतो.


निष्कर्ष:

तर मित्रांनो ही होती रेसिस्टरची संपूर्ण माहिती. Resistor म्हणजे काय? Resistor चे वेगवेगळे प्रकार (Types of resistor in Marathi) ही माहिती ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. 
तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना ही माहिती शेअर करा आणि अश्याच प्रकारच्या माहितीसाठी या ब्लॉगला परत भेट द्या. भेटुयात पुढच्या पोस्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद. 
थोडे नवीन जरा जुने