मित्रांनो हेडफोन (earphones) घालून गाणी ऐकायला मज्जाच वेगळी असते. खरंय ना. आपण नेहमी गाणी ऐकण्यासाठी, कोणासोबत बोलण्यासाठी हेडफोनचा वापर करतो. म्हणूनच की काय मोबाईल कंपन्या सुद्धा मोबाईल बरोबर हेडफोन्स देतात. आता देत नाहीत तो भाग वेगळा आहे. 

पण मित्रांनो एखादी गोष्ट जितकी आपल्यासाठी चांगली असते तितकीच ती घातक सुद्धा असते. असच काही आहे हेडफोनच्या बाबतीत. आजच्या या पोस्टमध्ये आपण हेडफोन (Earphone) वापरण्याचे दुष्परिणाम (Disadvantages of Earphone in Marathi) काय आहेत हे जाणून घेणार आहोत. 


Disadvantages of Earphone / Headphone in Marathi

हेडफोन (Earphone) वापरण्याचे दुष्परिणाम | Disadvantages of Earphone / Headphone in Marathi


हेडफोन (Earphone) वापरण्याचे दुष्परिणाम


चक्कर येणे:

तुम्ही गाणे किंवा फोनवर बोलण्यासाठी इअरफोन वापरता का? असे असेल तर मर्यादेत इअरफोन वापरा. त्याचा जास्त आवाज असेल तर तुमच्या कानावर ताण पडेल. आणि त्यामुळे तुम्हाला चक्कर येऊ शकते.

ऐकण्याची क्षमता कमी होणे:

खूप जास्त आवाजामुळे तुमची मनाची शांती कमी होऊ शकते. नोडज इंड्युसड हिअरिंग लॉस (NIHL) हा आजार केवळ मोठ्या आवाजाने नव्हे तर बराच वेळ इअरफोन वापरल्याने सुद्धा होतो. त्यामुळे कमी आवाजातच गाणी ऐकण्याचा प्रयत्न करा. 

मेंदुवर होणारा परिणाम:

हेडफोनने निर्माण होणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटीक वेव्समुळे मेंदुवर दीर्घकाल परिणाम होतो. उच्च डेसिबल आवाजामुळे कानातून मेंदूपर्यंत सिग्नल घेऊन जाणाऱ्या तंत्रिका तंतूपासून इन्सुलेशन मागे घेते. कानाच्या संसर्गामुळे मेंदूतही परिणाम होऊ शकतो.

कानातील वेदना:

इअरफोनचा दीर्घकालीन वापर तसेच योग्यरित्या फिट न होणाऱ्या इअरफोनचा वापर देखील कानातील वेदनेसाठी कारणीभूत ठरतो. जे बहुतेकदा आतील कानापर्यंत वाढू शकते आणि यामुळे कानाच्या भोवतालच्या भागात डोके दुखू शकते.

कान सुन्न होणे:

ताज्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, जे लोक मोठ्याने संगीत ऐकण्यासाठी दिवसात बहुतेक वेळा इअरफोन किंवा हेडफोन वापरतात त्यांचे कान सुन्न झाले आहेत. त्यांची ऐकण्याची क्षमता थोड्या काळासाठी सुन्न होते आणि नंतर पुन्हा सामान्य होते. ऐकण्याची ही सुन्नता धोकादायक असू शकते आणि बहिरेपणास कारणीभुत ठरू शकते. 

कानाला होणारे संक्रमण:

इअरफोन कानात हवेची ये-जा होण्यापासून रोखू शकतो, त्यामुळे कानाचे संक्रमण होण्याची शक्यता वाढते. तसेच, जेव्हा एकमेकांचे इअरफोन वापरले जातात, तेव्हा त्या व्यक्तीच्या कानातील समान जीवाणू दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित होतात आणि त्या व्यक्तीस कानाला गंभीर संक्रमण देखील होते.म्हणून आपण कधीही दुसऱ्याचे हेडफोन वापरू नयेत. 

हेडफोन चे होणारे तोटे तर आपण पाहिलेत. आता आपण पाहूया हे होऊ नये म्हणून आपण काय केले पाहिजे. 

कानास नुकसान न होऊ देता इअरफोन्स कसे वापरावे?


  • कानात सरळ जाणारे लहान आकाराचे इअरफोन वापरणे टाळा. 
  • एकमेकांचे इअरफोन वापरणे टाळा. 
  • महिन्यातून एकदा आपल्या इयरफोनचे स्पंज / रबर कव्हर बदला.
  • आपण कार, ट्रेन, मेट्रो किंवा अगदी चालत असताना इअरफोन वापरू नका.
  • इअरफोन वापरण्याचा वेळ कमी करा.
  • हल्ली बाजारात खूप वेगवेगळ्या कंपनीचे हेडफोन आले आहेत. आपण ते स्वस्त आहेत म्हणून खरेदी करतो पण आपल्याला ते धोक्यात आणि शकतात. म्हणून हेडफोन घेताना चांगल्या कंपनीचा घ्यावा. 

तर मित्रांनो हे होते हेडफोन (Earphone) घालण्याचे दुष्परिणाम (Disadvantages of Earphone in Marathi) आणि हे होऊ नये म्हणून करावयाचे उपाय. 

तर मित्रांनो हेडफोन घालण्याचे दुष्परिणाम काय आहेत ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि अश्याच प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या. भेटुयात पुढच्या पोस्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद. 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल:


थोडे नवीन जरा जुने