प्रत्येक स्त्रीला असच वाटत की आपण सर्वात सुंदर दिसावं.आपण चेहरा नेहमी तेजस्वी दिसावं. आपलं लोकांनी कौतुक करावं. त्यासाठी त्या काहीही करू शकतात. त्यासाठी आजच्या या पोस्टमध्ये आपण प्रत्येक महिलेला माहित असावेत असे काही ब्युटी हॅक्स (Women's Beauty Hacks In Marathi) जाणून घेणार आहोत.
प्रत्येक महिलेला माहित असावेत असे काही ब्युटी हॅक्स | Women's Beauty Hacks In Marathi
ग्रीन टी:
डिटॉक्सिफिकेशनसाठी ग्रीन टी उत्तम आहेच, पण त्यासोबतच त्वचेसाठीही उत्तम आहे. त्यातील अँटिऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीमाइक्रोबियल घटकांमुळे त्वचेवरील लालसरपणा आणि सूज दूर करण्यास मदत होते. तसेच डोळ्यांच्या खालची काळी वर्तुळे (डार्क सर्कल्स) घालवण्यासाठी मदत करते.
बदाम तेल:
बदामाचे तेल डार्क सर्कल्स आणि डोळ्यांखालील सूज कमी करण्यात मदत करतात. तसेच चेहऱ्यावरील मुरुमांवरदेखील बदाम तेल उपयुक्त आहे. या तेलात रेटिनॉल, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के असते, ज्यामुळे आपल्या डोळ्यांखालील नाजूक त्वचेला इजा न होता ती गुळगुळीत राहते.
व्हॅसलिन:
आपल्या त्वचेतील आद्रता टिकून ठेवण्यासाठी व्हॅसलिन एक सुरक्षित आणि प्रभावी मार्ग आहे. मेकअप काढण्यासाठी याची मदत होते. तसेच व्हॅसलिन संवेदनशील त्वचेचे संरक्षण करते आणि लहान जखमा भरण्यासही व्हॅसलिनची मदत होते.
थंड पाणी:
मेकअप अधिक काळ टिकून ठेवण्यासाठी मेकअप करण्यापूर्वी चेहरा थंड पाण्याने चेहरा धुवून घेणे, ही बेस्ट टिप आहे. चेहरा थंड पाण्याने धुतल्यामुळे चेहऱ्यावरील छिद्रे टाईट होतात, त्यामुळे केलेला मेकअप अधिक काळ टिकून राहतो. दिवसातून दोन वेळा आपला चेहरा थंड पाण्याने स्वच्छ घूणे गरजेचे आहे.
मध:
शरीरावरील घाव किंवा त्वचेवरिल डाग घालवण्यास मध उपयुक्त आहे. त्वचेवरील मुरुमांचे डाग घालवण्यासाठी मध मदत करते. डाग असलेल्या ठिकाणी मधाचा वापर एखाद्या क्रिमप्रमाणे करू शकता. रोज किंवा दर 2 दिवसांनी मध मुरुमांच्या डागांवर पेस्ट म्हणून लावल्याने फायदा होऊ शकतो.
खोबरे तेल:
केस धुण्यापूर्वी केसांना खोबरे तेलाने मालिश करावी. केस शॅम्पूने धुण्यापूर्वी दहा मिनिटांपूर्वी खोबरे तेलाने केसांमध्ये सौम्य मालिश केल्याने केसांचे आरोग्य सुधारते. खोबरेल तेल केस निरोगी आणि चमकदार बनवण्यास मदत करते.
डार्क सर्कल्ससाठी थंड चमचा:
तुमच्याकडे ग्रीन टी बॅग्ज किंवा कॅफिनेटेड डार्क सर्कल्स क्रिम नसेल तर थंड चमचा अतिशय उपयोगी आहे. दोन स्वच्छ स्टीलचे किंवा इतर कोणत्याही धातूचे चमचे पाण्यात बुडवून फ्रीजरमध्ये कमीतकमी 10 मिनिटे ठेवा. चमचे थंड झाल्यानंतर ते काही मिनिटांसाठी हळुवारपणे डोळ्यावर ठेवा. त्यामुळे डार्क सर्कल कमी होण्यास मदत होते.
तर हे होते प्रत्येक महिलेला माहित असावेत असे काही ब्युटी हॅक्स (Women's Beauty Hacks In Marathi). तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्र मैत्रीणीना पण शेअर करा. भेटुयात पुढच्या पोस्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल: