मित्रांनो जत हा महाराष्ट्र राज्यातील, सांगली जिल्ह्यातील एक मोठा तालुका आहे. जत तालुक्याला काही काळापासून दुष्काळग्रस्त तालुका म्हणून सुद्धा ओळखले जाते. परंतु आता जत तालुक्याची हळूहळू परिस्थिती बदलत आहे. हळूहळू जतचा विकास होत आहे.
तर मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण 1962 पासून 2019 पर्यंत झालेले जत तालुक्यातील आमदार (Jath taluka mla in Marathi) यांची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूया जत तालुक्यातील आतापर्यंतचे आमदार.
1962 पासून 2019 पर्यंत झालेले आतापर्यंतचे जत तालुक्यातील आमदार | जत तालुका आमदार | All MLA in Jath Taluka
मित्रांनो 1967 पासून 2004 पर्यंत जत मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव होता.
जत तालुक्यातील 1962 पासून आतापर्यंत झालेले आमदार:
- 1962 मध्ये जत मतदार संघातून तुकाराम कृष्णराव शेंडगे 28 हजार 765 मतांनी निवडून आले होते. ते काँग्रेस या पक्षाचे उमेदवार होते.
- 1967 मध्ये शिवरुद्र बामणे हे जत मतदारसंघातून 28 हजार 23 मतांनी निवडून आले होते. ते काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते.
- 1972 मध्ये परत जत मतदारसंघातून शिवरुद्र बामणे 39 हजार 96 मतांनी निवडून आले. ते काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते.
- 1978 मध्ये जयंत सोहनी जत मतदार संघातून 22 हजार 40 मतांनी निवडून आले होते. ते काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते.
- 1980 मध्ये परत जत मतदार संघातून जयंत सोहनी 29 हजार 36 मतांनी निवडून आले होते. ते काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते.
- 1985 मध्ये जत मतदार संघातून उमाजीराव सनमडीकर 34 हजार 992 मतांनी निवडून आले होते. ते काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते.
- 1990 मध्ये परत जत मतदार संघातून उमाजीराव सनमडीकर 41 हजार 54 मतांनी निवडून आले होते. ते Indian National Congress पक्षाचे उमेदवार होते.
- 1995 मध्ये जत मतदार संघातून मधुकर शंकर कांबळे 54 हजार 254 मतांनी निवडून आले होते. ते इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते.
- 1999 मध्ये परत जत मतदार संघातून उमाजीराव सनमडीकर 51 हजार 118 मतांनी निवडून आले होते. ते काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते.
- 2004 मध्ये जत मतदार संघातून सुरेश खाडे 63 हजार 59 मतांनी निवडून आले होते. ते भाजपा पक्षाचे उमेदवार होते.
- 2009 मध्ये जत मतदार संघातून प्रकाश अण्णा शेंडगे 58 हजार 320 मतांनी निवडून आले होते. ते भाजपा पक्षाचे उमेदवार होते.
- 2014 मध्ये जत मतदार संघातून विलासराव जगताप 72 हजार 885 मतांनी निवडून आले होते. ते भाजपा पक्षाचे उमेदवार होते.
- 2019 मध्ये जत मतदार संघातून विक्रम बाळासाहेब सावंत 87 हजार 184 मतांनी निवडून आले आहेत. ते काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत.
तर मित्रांनो हे आहेत जत तालुक्यातील आतापर्यंतचे आमदार. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. ही माहिती तुमच्या मित्र परिवाराला शेअर करा. अश्याच प्रकारची माहिती दररोज जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉगला परत भेट द्या. भेटुयात पुढच्या पोस्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद.