मित्रांनो मराठी लाइफहॅक्स (Lifehacks in Marathi) च्या आजच्या तिसऱ्या भागात आपलं स्वागत. मित्रांनो आजच्याही पोस्टमध्ये आपण काही मराठी लाइफहॅक्स (Marathi Lifehacks) जाणून घेणार आहोत. 

25 Marathi Lifehacks in Marathi

मराठी लाइफहॅक्स | 25 Marathi Lifehacks in Marathi 


1) आपल्या शरीरात जर प्लेटलेट्सची कमी असेल तर नारळपाणी तुमच्यासाठी फायदेशीर आहे. 

2) राग आल्यावर मनातल्या मनात गुणगुणत जा त्यामुळे राग शांत होईल. 

3) कोमट पाण्यामध्ये हळद घेतल्यास शरीरात साखरेची पातळी कमी होते नियमित सेवन केल्यास टाईप 2 मधुमेहाच्या रुग्णांची लक्षणेही सुधारतात. 

4) तुम्हाला रात्री घोरण्याची सवय असल्यास आहारात कांद्याचा समावेश करा त्याने सर्दीमुळे चोंदलेले नाक मोकळे होऊन घोरण कमी होत. 

5) थंडीच्या दिवसात खूप पाणी पिल्याने शरीरात संक्रमण होत नाही तसेच सर्दी, खोकला या समस्येपासून सुटका होते. 

6) नियमित धन्याचे पाणी पिल्याने तोंडाच्या दुर्गधीपासून सुटका होते. 

7) रोज काहीतरी नवीन आणि वेगळ वाचायला आवडत असेल तर विकिपीडिया वर RANDOM ARTICLES ची WINDOW तुम्हाला फायदेशीर ठरेल. 

8) गाईचे तूप आणि पिठीसाखर सेवन केल्याने डोळ्याचे तेज वाढते. 

9) WETRANSFER.COM या साईट च्या मदतीने तुम्ही खूप मोठ्या (GB मध्ये) असणाऱ्या FILES सुद्धा एकमेकांसोबत SHARE करू शकता. 

10)मोड आलेले मूग केसांसाठी फायदेशीर मानले जातात त्यांमधून मिळणार व्हिटॅमिन सी केसांच्या वाढीस मदत करते. 


11) काळ्या द्राक्षांचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. द्राक्षांमध्ये रेसवर्टाल नावाचा पदार्थ असतो जो रक्तामध्ये इन्स्युलिन वाढविण्याचे काम करतो. या द्वारे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित केली जाऊ शकते.

12) उन्हात जळालेली त्वचेवर चमक आणण्यासाठी नारळपाणी,कच्चं दूध, काकडी आणि लिंबाचा रस आणि चंदन पावडर मिसळून अंघोळीच्या पूर्वी शरीरावर लावा.

13) गरम दूध आणि गूळ यात भरपूर प्रमाणात लोह असते. दररोज याचे सेवन केल्याने हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढतं. अशक्तपणा दूर होतो.

14) पनीरचे सेवन दातांसाठी फायदेशीर आहे. या मध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात असल्यामुळे दातांना बळकट ठेवण्यासाठी मदत करत.

15) ताप आल्यावर दही भात खाणे फायदेशीर ठरते. अनेकदा तापात काही खाण्याची इच्छा होत नाही. मात्र दही भात खाल्याने शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. तसंच दह्यामुळे तुमची इम्मुनिटी वाढते.

16) जेवणानंतर हळदीयुक्त दूध प्यायल्याने तुम्हाला चांगली झोप येईल.

17) जेवणानंतर लगेच सिगरेट ओढल्याने तुमची पचन क्रिया बाधित होते तसेच कॅन्सर चा धोका वाढतो. 

18) कपड्यावर शाई पडली की ती ओली असतानाच त्यावर मीठ घासून धुवा त्यामुळे शाईचा डाग पडणार नाही. 

19) दह्यामध्ये अनेक प्रकाराचे घटक आढळतात. ज्यांना खाल्ल्यानं शरीराला फायदा होतो. दह्यात कॅल्शियम, प्रथिन आणि व्हिटॅमिन असतात. दह्याचे नियमित सेवन केल्यानं त्वचेला मऊसर बनविण्यात मदत मिळते.

20) तिखट पदार्थासोबत दूध सेवन करू नये यामुळे तुम्हाला GAS आणि अपचनाची समस्या उद्भवू शकते. 


21) वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर दररोज दही, पालक तीळ, आळशी, मेथीची भाजीचे सेवन करा या समस्येपासून फायदा होतो.

22) अंघोळीच्या पाण्यात अर्धा कप बेकिंग सोडा टाका त्यामुळे अंगावरील घाम, तेल निघून जाईल. तुमची त्वचा नितळ आणि मुलायम होईल. 

23) मुलाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असल्यास ओलिव्ह ऑईल वापरू शकता. शरीरात हे टेचक प्रमाणे काम करत. जे मुलास निरोगी ठेवते आणि बद्धकोष्ठता दूर करते.

24) तापातून बरे झाल्यानंतर शेवग्याची भाजी खावी त्यामुळे भूक पूर्ववत होते. 

25) गाजरामध्ये असा एक पदार्थ असतो जो हिरड्याच आरोग्य राखतो जास्त प्रमाणात लाळ तयार होते यामुळे तोंडाच्या समस्या उद्भवत नाहीत. 

तर मित्रांनो हे होते 25 मराठी उपयुक्त लाईफहॅक्स (25 Useful lifehacks in Marathi). हे लाईफहॅक्स तुम्हाला कसे वाटले हे कमेंट मध्ये नक्की सांगा. ही माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा. अश्याच प्रकारची माहिती दररोज जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉगला परत भेट द्या. भेटुयात पुढच्या पोस्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद. 

थोडे नवीन जरा जुने