मित्रांनो Diode तुम्ही नक्कीच पहिला असेल, आणि तुम्हाला त्याच्याबद्दल आणखी जाणून घायच आहे ना. तर चला आजच्या या पोस्टमध्ये आपण डायोड Diode म्हणजे काय (What is Diode in Marathi), Diode चे कोणते प्रकार (Types of Diode in Marathi) आहेत, Diode चा वापर कोठे केला जातो याची माहिती जाणून घेऊ या. (Diode Information in Marathi)
डायोड (Diode) म्हणजे काय | Diode चे प्रकार | What is Diode in Marathi
Diode काय आहे (What is Diode in Marathi):
Diodeएक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे जे current ला एकाच दिशेने Flow होऊ देतो. म्हणजेच Current ला दुसऱ्या दिशेने वाहू देत नाही. यामध्ये दोन electrode असतात. एकाच नाव Cathode आणि दुसऱ्याच नाव Anode असतं. Diode Semiconductor ने बनलेला असतो.
Diode चिन्ह (Symbol of Diode):
Diode मध्ये Anode आणि Cathode चा अर्थ काय असतो (What is the meaning of Anode and Cathode in Marathi):
सर्व Diode मध्ये आपल्याला दोन टर्मिनल पाहायला मिळतात. यामधील Anode म्हणजे Positive आणि Cathode म्हणजे Negative असतो.
जर आपण Diode ला पाहिले तर त्यातील एक बाजू White Stripe ने (पांढरी) बनलेली असते, त्या बाजूला Cathode टर्मिनल म्हणतात. म्हणजेच हे Negative टर्मिनल असते. याशिवाय दुसऱ्या बाजूचा टर्मिनल Anode म्हणजेच Positive असतो.
Diode चा उपयोग कोठे केला जातो (Uses of Diode in Marathi):
Diode चा उपयोग अनेक उपकरणामध्ये केला जातो. जसं की rectifier, signal limiters, voltage regulator इत्यादी. या सर्व उपकरणांमध्ये आपल्याला सहज Diode पाहायला मिळेल. याशिवाय अनेक उपकरणांमध्ये आपल्याला Diode पाहायला मिळतो.Diode चा उपयोग काही जागी वेगवेगळ्या कारणांसाठी केला जातो. परंतु जर आपण याचा मुख्य उपयोग पाहिला तर AC Current ला DC Current मध्ये बदलण्यासाठी केला जातो.
डायोड मध्ये बायस काय आहे (What is the bias in the diode):
Diode मध्ये दोन बायस असतात. ते वायर नुसार काम करतात. त्यातील एक फॉरवर्ड बायस आणि दुसरा असतो रिवर्स बायस.Forward bias (फॉरवर्ड बायस):
फॉरवर्ड बायस मध्ये Current Positive साईड कडून Negative साइड कडे फ्लो होतो. म्हणजेच Current Diode च्या Anode टर्मिनल पासून Cathode टर्मिनल कडे फ्लो होतो.जेव्हा आपण Positive Voltage ला Anode ने आणि Negative Voltage ला Cathode ने जोडतो त्यावेळेस Diode Current फ्लो होऊ देतो यालाच Forward bias (फॉरवर्ड बायस) असे म्हणतात.
Reverse bias (रिवर्स बायस):
जेव्हा Diode Anode च्या Negative Voltage ने आणि Cathode ला Postive ने जोडतो. तेव्हा हे Current ला पुढे फ्लो होऊ देत नाही. यालाच आपण Reverse bias (रिवर्स बायस) असे म्हणतो.
डायोड (Diode) चा कार्य सिद्धांत (Working Principle of Diode in Marathi):
Diode च्या काम करण्याच्या पद्धतीला आपण एका उदाहरणादाखल समजून घेऊ.समजा आपल्याकडे एक Diode, दोन वायर, एक बॅटरी आणि एक LED आहे. आपण बॅटरी च्या Positive साइडला डायोड च्या Anode ने वायर च्या मदतीने जोडले. आता आपण बॅटरी च्या Negative साइडला LED जोडूया आणि LED च्या दुसऱ्या टोकाला Diode च्या Cathode ने जोडूया.
अशा प्रकारे Connection झाल्यानंतर Current Anode कडून Cathode कडे फ्लो होईल. यामध्ये Diode Current ला पुढे जाऊ देईल आणि LED ग्लो (पेटेल) होईल. याला आपण Forward bias (फॉरवर्ड बायस) म्हणतो.
जर आपण याच connection मध्ये Diode च्या Anode ला Positive Supply च्या जागी Negative Supply आणि Cathode ला Negative Supply च्या जागी Positive Supply जोडला तर, तो Diode Current फ्लो होऊ देत नाही. आणि याच प्रक्रियेला आपण Reverse bias (रिवर्स बायस) म्हणतो.
डायोड (Diode) चे प्रकार (Types of Diode in Marathi):
मित्रांनो तस तर Diode च्या उपयोगाच्या आधारावर अनेक प्रकार पडतात. परंतु आपण त्यातील काही महत्वाचे प्रकार जाणून घेऊ या.1) Small Signal Diode:
याच्या नावावरूनच आपल्याला समजते की हा Small Signal वर Diode आहे. हा Diode मुख्यकरून त्या Device मध्ये पाहायला मिळतो ज्यामध्ये Frequency जास्त आणि Current खूप कमी असतो. जसं की रेडिओ. जर आपण या diode ची maximum current capacity पाहिली तर ती 150 mA आहे. हा Diode खूप Current Flow वरच काम करू शकतो.2) Large Signal Diode:
हा Diode खूप heavily Charged राहतो. अनेक वेळेस AC To DC बदलण्यासाठी Diode चा वापर केला जातो हे तुम्हाला माहीत असेलच. जास्त करून त्या ठिकाणी Large Signal Diode चा वापर केला जातो.हा Diode फॉरवर्ड करंट आपल्यापासून फ्लो होऊ देतो आणि Current Reverse आल्यानंतर त्याला ब्लॉक करतो. हा Diode जास्त करून आपल्याला Charging Socket आणि Inverter मध्ये पाहायला मिळतो.
3) Zener Diode:
हा Diode एक Reverse Bias वर काम करणारा Diode आहे. याचा वापर जास्त करून Voltage Regulator करण्यासाठी केला जातो. याला आपण एका उदाहरणादाखल समजून घेऊ.समजा आपल्याकडे एक चार्जर आहे जो आपल्याला 12 Volt सप्लाय देतो. जर मला 12 Volt charger ला 5 Volt ची एखादी मोटर जोडायची असेल तर त्यामधे आपल्याला Zener Diode वापरावा लागतो. कारण 5 Volt वर चालणाऱ्या मोटरला जर 12 विकत supply दिला तर ती मोटर खराब होईल. Zener Diode 1.2 Volt पासून 200 Voltage पर्यंत सप्लाय कंट्रोल करू शकतो.
4) Avalanche Diode:
हा Diode सुद्धा Zener Diode प्रमाणे Reverse Bias वर काम करतो. हा Diode Avalanche breakdown principle वर काम करतो. याचा उपयोग जास्त करून RF Noise Generation आणि Microwave Frequency Generation मध्ये केला जातो.5) TVS Diode (Transient Voltage Supersession):
हा Diode सुद्धा Zener Diode सारखाच असतो. याचा वापर आपण Protection साठी करतो. हा Diode Extreme Voltage पासून आपल्या Circuit ला वाचवतो. जसं की आपण AC सिस्टीम मध्ये फ्युज वापरतो, कारण जरी एकदम Current ची value वाढली तरी फ्यूज आपल्या आपल्या सिस्टीम ला सुरक्षा देईल. या प्रमाणेच हा Diode सुद्धा काम करतो. हा Duode एकदम जास्त व्होल्टेज आले तरी सर्किटला त्याला वाचवू शकतो.6) Gunn Diode:
हा Diode Negative Resistance वर काम करणारा Diode आहे.यामध्ये P Region नसतो यात फक्त N Region असतो. या Diode मध्ये N Region असल्यामूळे जेव्हा सर्किट मध्ये Voltage वाढते तेव्हा current सुद्धा वाढतो. परंतु एका ठराविक level पर्यंत गेल्यानंतर अचानक Current Low होतो. यामुळे याला Transferred Electrons Device असं सुद्धा म्हणतात. हा Diode जास्त करून Microwave RF Device मध्ये पाहायला मिळतो.7) LED (Light Emitting Diode):
LED हा एक असा Diode आहे ज्यामधून Current फ्लो झाल्यानंतर लाईट लागते. असं यामुळे होत कारण यामध्ये Current Carry करणारे घटक म्हणजेच इलेक्ट्रॉन्स, होल्स एकमेकांसोबत जोडलेले असतात.8) Laser Diode:
हा Duode LED प्रमाणेच काम करतो. परंतु यामध्ये PN Junction च्या मध्ये एक Reflection Layer लावला जातो. याचा वापर जास्त करून CD, Laser Light आणि Blu-ray मध्ये केला जातो.9) Constant Current Diode:
आता पर्यंत आपण जे Diode पाहिले ते Voltage ला Control करत होते पण हा Diode Current ला Control करतो.हा एका Specific Value पर्यंत current ला पुढे जाऊ देतो आणि त्यानंतर Current ला Block करतो. म्हणजेच हा Diode फक्त मर्यादित Current फ्लो होऊ देतो.
10) Varactor Diode:
हा Duode Variable Capacitor प्रमाणे काम करतो.
आपल्याला तर माहीतच आहे Capacitor DC ला ब्लॉक करून AC Current ला वाहू देतो याप्रमाणेच ह सुद्धा काम करतो. याच्या मदतीने आपण Circuit मधील Voltage बदलून पाठवू शकतो. हे जास्त करून Satellite आणि मोबाईल्स मध्ये वापरले जातात.