हल्ली व्यस्त जीवनशैलीमध्ये व्यायामाकडे दुर्लक्ष होते आहे. प्रत्येकाला आपण तंदुरुस्त रहावे असे वाटते. मात्र वेळेअभावी व्यायाम करणे शक्य होत नाही. तर अनेकदा तुमच्या व्यायामामध्ये अडथळे देखील येत असतात. मात्र 'इच्छा असते तिथे मार्ग नक्कीच निघतो' या म्हणीप्रमाणे ज्यांना व्यायाम करायचा आहे ते त्यासाठी वेळ काढतात. यासाठी जीमला जायला हवे असेही नाही. सूर्यनमस्कार घालणे हा देखील एक व्यायामाचा सोपा प्रकार आहे.
आजच्या या पोस्टमध्ये आपण सूर्यनमस्कार माहिती, सूर्यनमस्कार चे फायदे, सूर्यनमस्कार चे प्रकार यांची माहिती जाणून घेणार आहोत.
सूर्यनमस्कार ची माहिती मराठी:
हजारो वर्षांपासून सूर्याची उपासना करणारे संत आहेत. सूर्याप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सूर्याची उपासना करणे म्हणजे सूर्यनमस्कार घालणे होय. त्यासाठी 12 वेगवेगळ्या मंत्रोच्चारांद्वारे सूर्यनमस्कार घातले जातात. तर या व्यायामामुळे शरीराच्या सर्व अवयवांचे सामर्थ्याने सहनशीलता वाढण्यास मदत होते.
योगातील सूर्यनमस्कार हे एक आसन म्हणून ओळखले जाते. ज्याचे शारीरिक भावनिक आणि आध्यात्मिक फायदे आहेत. त्यामुळे शरीर लवचिक होण्यास मदत होते. तसेच मनाला शांती मिळवून शरीरातील मंदावलेल्या चक्रांना सक्रिय करण्यास मदत होते. तर मंत्रोच्चार करून सूर्यनमस्कार घालणाऱ्यांना मानसिक शांतीचा देखील अनुभव येतो.
सूर्यनमस्कार यामध्ये 12 आसनांचा समावेश आहे. एक सूर्यनमस्कार आपल्या शरीरातील डोक्यापासून पायापर्यंतच्या जवळजवळ 92% स्नायूंना ताकद देतो. शरीराचा वरचा भाग, खालचा भाग सर्व स्नायू बळकट होऊन चयापचय सुधारते. पोटावरील चरबी कमी होते, रक्तप्रवाह सुरळीत होतो, चेहऱ्यावर चमक येते आणि शरीरातील अनावश्यक घटक बाहेर टाकले जातात.
शहरातील बहुतेक मज्जातंतू मणक्यांमधून जात असल्याने सूर्यनमस्कारामुळे मेरु दंड मजबूत होण्यास मदत होते. तर मंदावलेल्या ग्रंथींच्या कार्यक्षमतेची चालना मिळून महिलांमध्ये अनियमित मासिक पाळी सुधारण्यास मदत होते. त्याचबरोबर कमी वेगाने सूर्यनमस्कार घातल्यास शरीराची लवचिकता सुधारते. मध्यम वेगाने सूर्यनमस्कार घातल्यास स्नायूंचे आरोग्य सुधारते तर वेगाने सूर्यनमस्कार घातल्यास वजन कमी होण्यास मदत होते.
जाणून घ्या सूर्यनमस्काराचे फायदे :
प्राणनामना:
या स्थितीला प्रार्थना स्थिती असे म्हणतात. सूर्यनमस्काराचे एकूण बारा चरण आहेत. त्यापैकी हे चरण सर्वात सोपे आहे. त्यामुळे व्यायाम सुरू करण्याअगोदर मन मज्जासंस्था आणि शरीर शांत होऊन हृदय चक्र संतुलित राहते.
हस्तो आसन:
याला उदयोन्मुख चरण असे म्हणतात. हे 11 वे चरण असून यामुळे शरीर लवचिक होते पाठ दुखी कमी होते, पाठीचा कणा मजबूत होतो, मानेच्या स्नायूंचा तणाव कमी होतो, फुफ्फुसांचा विस्तार होतो त्यामुळे शरीराची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता वाढते. तर घशाच्या समस्या असणाऱ्या लोकांसाठी हे चरण घसा चक्र संतुलित करण्यास मदत करते.
हस्तपादासन :
सूर्यनमस्काराचे हे 3 आणि 10 दहावे चरण आहे. यामुळे ओटीपोटातील स्नायू मज्जासंस्था मजबूत होते, मेंदूतील रक्तप्रवाह वाढतो, स्मरणशक्ती आणि लक्ष केंद्रित होण्यास मदत होते. यामुळे ओटीपोटातील सौर चक्र सुरळीत होण्यास मदत होते.
अश्वसंचलनासन:
हे सूर्यनमस्काराचे 4 थे आणि 9 वे चरण आहे. यामुळे पायांची लवचिकता वाढते, त्याचबरोबर स्नायू मजबुत होतात.. ओटीपोटातील स्नायू मजबूत होतात.
चतुरंगदंडासान:
सूर्यनमस्कराचे हे 5 वे चरण आहे. यामुळे मनगट, पाय, आणि हाताचे स्नायू मजबूत होतात. यामुळे शरीरातील सौर चक्र कार्यान्वित होते. पोटावरील चरबी कमी होते.
अष्टांग नमस्कार :
सूर्यनमस्काराचे हे 6 वे चरण असून यामुळे छाती, पाय, हात मजबूत होतात. ओटीपोटातील अवयवांसाठी हे फायदेशीर असून यामुळे शरीरात सर्व चक्रांचे संतुलन राखले जाते.
चतुरंगदंडासान :
सूर्यनमस्कराचे हे 5 वे चरण आहे. यामुळे मनगट, पाय, आणि हाताचे स्नायू मजबूत होतात. यामुळे शरीरातील सौर चक्र कार्यान्वित होते. पोटावरील चरबी कमी होते.
अष्टांग नमस्कार :
सूर्यनमस्काराचे हे 6 वे चरण असून यामुळे छाती, पाय, हात मजबूत होतात. ओटीपोटातील अवयवांसाठी हे फायदेशीर असून यामुळे शरीरात सर्व चक्रांचे संतुलन राखले जाते.
भुजंगासन:
सूर्यनमस्काराचे हे 7 वे चरण असून यामुळे डोकेदुखी पाठ दुखी कमी होऊन मान, मणक्यावरील ताण कमी होतो. मणक्याची लवचिकता वाढवून स्लिप डिस्क होण्यापासून रोखता येते.
अधोमुखासन :
हे सूर्यनमस्काराचे 8 वे चरण असून यामुळे तणाव दूर होतो, रक्ताभिसरण सुधारते, श्वासोच्छवास चांगला होतो, हात, पाय आणि नसा बळकट होतात पाठीच्या स्नायू कार्यान्वित होतात.
सूर्यनमस्कार किती घालावेत:
दररोज सूर्यनमस्काराचा सराव करताना सूर्यनमस्कार किती घालता? यापेक्षा तुम्ही प्रत्येक आसन कसे करता? यावर भर द्या. नियमित सराव करा. आपला सराव सुधारा. श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करा. तसेच सूर्यनमस्कार घालताना मंत्र उच्चार केल्यास तुम्हाला मानसिक शांती देखील मिळेल.
सूर्यनमस्कार कधी घालावेत:
सूर्य उगवत असताना सूर्यनमस्कार करण्याची योग्य वेळ आहे. त्यामुळे सूर्यनमस्कार घालत असताना प्राधान्याने सकाळीच सूर्यनमस्कार घाला. रिकाम्या पोटी किंवा जेवणानंतर तीन ते चार तासांच्या अंतराने सूर्यनमस्कार घाला. सूर्यनमस्कार घालताना तुम्ही नवीन असाल तर प्रशिक्षकाच्या निरीक्षणाखाली सूर्यनमस्कार घाला उच्च रक्तदाब, नुकतीच शस्त्रक्रिया झाली असल्यास, पाठदुखी या लोकांनी सूर्यनमस्कार घालू नये. तर सूर्यनमस्कार यानंतर काही मिनिटे श्वसन करावे.
निष्कर्ष:
तर मित्रांनो ही होती सूर्यनमस्कार ची माहिती, सूर्यनमस्कार चे फायदे, सूर्यनमस्कार चे प्रकार यांची माहिती पाहिली. जर तुम्हाला ही माहिती आवडली तर तुमच्या मित्रांना पण शेअर करा. आणि अश्याच प्रकारच्या पोस्टसाठी पुन्हा ब्लॉगला भेट द्या. भेटुयात पुढच्या पोस्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद.