मित्रांनो आजचे जग हे इंटरनेटचे जग आहे हे आपण जाणतोच. इंटरनेटच्या जगात वेबसाईट्स म्हणजेच संकेतस्थळाला अत्यंत महत्व आहे. दररोज लाखो युजर्स करोडो संकेतस्थळांना भेटी देत असतात.आजच्या या पोस्टमध्ये आपण वेबसाईटच्या वेगवेगळ्या प्रकारांविषयी (Types of Website in Marathi) माहिती जाणून घेणार आहोत. (Website information in Marathi)

वेबसाईट म्हणजे काय | वेबसाईटचे वेगवेगळे प्रकार | Types of Website in Marathi


वेबसाईट म्हणजे काय (What is website in Marathi):

वेबसाईट म्हणजे संबंधीत व्यक्तीचा, व्यवसायाचा ऑनलाईन पत्ता होय किंवा त्याच्या कामाचा ऑनलाईन आलेख होय.

वेबसाईटचे वेगवेगळे प्रकार (Types of Website in Marathi)


1) ब्लॉगिंग वेबसाईट (Blogging Website) : 

या प्रकारच्या वेबसाईट्स या विविध लेखमालिका, बातम्या, फिचर रायटिंग यांसारखी माहिती देतात. ऑनलाईन न्यूजपेपर आणि ब्लॉग असणाऱ्या सर्व साईट्स या प्रकारात येतात.

2) ई-कॉमर्स (E-commerce Website) : 

ऑनलाईन वस्तू आणि सेवा खरेदी तसेच विक्रीसाठी इ-कॉमर्स वेबसाईट्स बनवल्या जातात. ऍमेझॉन, फ्लिपकार्ट या वेबसाईट्स इ कॉमर्स वेबसाईट्स आहेत.

3) पोर्टफोलिओ वेबसाईट (Portfolio Website) : 

तुम्ही देत असलेल्या सेवा किंवा कामाच्या नोंदी असलेली वेबसाईट म्हणजे पोर्टफोलिओ वेबसाईट होय. यात फोटोग्राफर, आर्किटेक्ट, पेंटर, डिझाइनर आणि इतरही अनेक व्यवसायांचा समावेश होऊ शकतो.

4) एज्युकेशनल वेबसाईट (Educational Website) : 

ऑनलाईनरीत्या शिक्षण किंवा प्रशिक्षण देणाऱ्या वेबसाइट्सला शैक्षणिक किंवा एज्युकेशनल वेबसाईट्स असे म्हटले जाते. यामध्ये विविध गोष्टींचे प्रशिक्षण दिले जाते.

5) बिझनेस वेबसाईट्स (Business Website):

अशा प्रकारच्या वेबसाईट्स या व्यावसायिक करत असलेल्या व्यवसायाची परिपूर्ण माहिती देणाऱ्या वेबसाईट्स असतात. यात व्यवसायाविषयी सर्व इत्यंभूत माहिती दिलेली असते.

6) इन्फॉर्मटिव्ह वेबसाईट (Informative Website) : 

एखाद्या वेबसाईटचा उद्देश हा केवळ वाचकांना काही विषयांची माहिती देणे इतकाच असतो. यांसारख्या वेबसाईटला इन्फॉर्मटिव्ह वेबसाईट म्हटले जाते.

निष्कर्ष:

तर मित्रांनो वेबसाईट म्हणजे काय (What is website in Marathi), वेबसाईट चे वेगवेगळे प्रकार (Types of Website in Marathi) ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण शेअर करा. आणि अश्याच प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या. भेटुयात पुढच्या पोस्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद. 


थोडे नवीन जरा जुने