नमस्कार मित्रांनो, आपलं जीवन सुखकर होण्यासाठी आपण नेहमी काही टिप्स शोधत असतो. ज्यामुळे आपलं काम सोपं होतं. आजच्या या पोस्टमध्ये आपण असेच काही मराठी लाईफहॅक्स (Useful lifehacks in Marathi) जाणून घेणार आहोत. 

मराठी लाइफहॅक्स


मराठी लाइफहॅक्स | Useful Lifehacks in Marathi 


1) दोन केळी खाल्ल्याने शरीराला 90 मिनिटांपर्यंत उर्जा मिळते. मैदानी खेळ खेळणाऱ्यांनी ब्रेकदरम्यान केळी खाणे फायदेशीर ठरते. 

2) कॉम्पुटर वर एखादया FILE चे नाव जलदरित्या बदलण्यासाठी तुम्ही F2 चा वापर करू शकता. 

3) कपड्यांवर पडलेले चहा-कॉफी चे डाग तुम्ही ग्लिसरीन वापरून घालवू शकता. 

4) चामखिळीपासून सुटका मिळण्यासाठी अननस रस, कांद्याचा रस आणि मध एकत्र करून लावावे.

5) रोज नियमाने पपई खाल्ल्यास भूक उत्तम लागते व अन्न उत्तम पचते.

6) गुळ खाण हाडांसाठी चांगलं असतं नेहमी सेवन केल्यास सांधेदुखीसारख्या समस्यांपासून सुटका होऊ शकते. 

7) तुमच्या लहान मुलांना कुठे गर्दीच्या ठिकाणी घेऊन जात असाल तर त्याच्या कपड्यांवर तुमचा मोबाईल नंबर नक्की चिटकवून ठेवा. 

8) मध्यरात्री झोपेतून उठून कधीही काही खाऊ नये त्यामुळे अपचन आणि जुलाबचा त्रास होऊ शकतो. 

9) बोटांची नखे चकचकीत करण्यासाठी ताज्या कापलेल्या लिंबाची फोड नखांवर चोळावी. 

10) वजन घटवण्यासाठी आहारात सब्जाचा समावेश करा. 

11) रिकाम्या पोटी पेनकिलर टॅब्लेट घेतल्याने किडनी आणि यकृतसंबंधी समस्या उद्भवू शकतात तसेच निद्रानाश आणि अस्वस्थता सुद्धा जाणवते. 

12) सकाळी एक तास चालल्याने संधीवताचा त्रास कमी होऊ शकतो तसेच स्टॅमिना आणि फुफ्फुसाची क्षमताही वाढते. 

13) घरातील झाडांसाठी तुम्ही कांद्याची साल खत म्हणून
वापरू शकता. 

14) तोंड आलं असल्यास अंजीर, द्राक्ष ही फळे खावीत. आहारात दूध, नारळ पाणी, कोथिंबीर यांचा समावेश असावा.

15) वटाणे सुकल्यानंतर त्यातील 'सी' जीवनसत्व कमी होते त्यामुळे शक्यतो ओल्या वटाण्यांचा उपयोग करणे उत्तम आहे.

16) नेल पेंट लावायच्या आधी नखांवर ACETONE लावल्याने नेल पेंट जास्त वेळ टिकून राहते. 

17) शेंगदाणे, काजू, बदाम, पिस्ता हे व्हिटॅमिन चे चांगले स्रोत आहेत यांमधून तुम्हाला व्हिटॅमिन E आणि B मोठया प्रमाणात मिळते. 

18) कपड्यांवरचे हळदीचे डाग घालवण्यासाठी तुम्ही व्हिनेगार किंवा लिंबूचा वापर करू शकता. 

19) कधीही जास्त पाव खाऊ नये पावाचे पदार्थ पचायला जड असतात त्यामुळे अपचनाचा त्रास होऊ शकतो कधी कधी पचायला 3 दिवसही लागतात. 


20) रात्री पाणी न पिता थोडे भाजलेले चणे खाऊन झोपल्याने खोकला कमी होतो.

21) CAMPING ला गेल्यानंतर डासांपासून वाचण्यासाठी तुम्ही बनवलेल्या शेकोटीमध्ये थोडी पुदिन्याची पाने टाकावी. 

22) दूध, हळद व साखर याचे गरमागरम मिश्रण पिण्याने घसादुखी कमी होते, लवंग चघळण्यानेही घसादुखी कमी होते.

23) सकाळी रिकाम्यापोटी टोमॅटो खाल्ल्याने एंसिडीटीचा त्रास होऊ शकतो

24) धने पाण्यात भिजत घालून नंतर कुस्करून पाणी गाळून घ्यावे त्या पाण्याने डोळे धुतल्यास डोळे दुखणे बंद होते.

25) डास चावल्यावर त्या जागी केळीची साल चोळल्याने खाज कमी होते. 

तर मित्रांनो हे होते 25 मराठी उपयुक्त लाईफहॅक्स (25 Useful lifehacks in Marathi). हे लाईफहॅक्स तुम्हाला कसे वाटले हे कमेंट मध्ये नक्की सांगा. ही माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा. अश्याच प्रकारची माहिती दररोज जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉगला परत भेट द्या. भेटुयात पुढच्या पोस्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद. 


थोडे नवीन जरा जुने