मित्रांनो गेल्या काही काळामध्ये इंटरनेट आणि टेक्नॉलॉजी यांचा खूप विकास झाला आहे. त्यामुळे लोकांचा फायदा आणि नुकसानही झाले आहे. कारण पहिला लोक आपला वेळ घालवण्यासाठी मित्र आणि आपल्या परिवारासोबत बसत होते. आता हेच लोक आपला अधिकाधिक वेळ इंटरनेटवर घालवत आहेत. इथे काही लोकांना ऑनलाईन व्हिडिओ पाहिला आवडतात, तर काही लोकांना ऑनलाइन गेम खेळायला आवडते. आणि यामुळेच आजच्या काळात गेम खुप अडवान्स प्रकारे बनवले जात आहेत. यामुळेच काही लोक आपला पूर्ण दिवस गेम खेळण्यामध्ये घालवतात. आजच्या या पोस्टमध्ये आपण अशाच एका गेम बद्दल जाणून घेणार आहोत (Free Fire information in marathi). जी लॉन्च झाल्यानंतर काही दिवसातच लोकांची आवडती गेम बनली होती. त्या गेमच नाव आहे फ्री फायर(Free Fire).
फ्री फायरची यशोगाथा | Free Fire Success Story In Marathi
फ्री फायर बद्दल थोडंसं (Free Fire information in marathi):
कारण पहिला अशा अनेक चांगल्या पद्धतीच्या गेम्स खेळण्यासाठी कॉम्प्युटर किंवा एक्सबॉक्स ची गरज पडत होती. पण जेव्हा फ्री फायर मोबाईल साठी लॉन्च केली गेली तेव्हा मोबाईल धारकांना ही गेम खूप आवडू लागली. तुम्ही जर गेम खेळण्यांमध्ये शौकीन असाल तर तुम्हाला या गेम बद्दल नक्कीच माहिती असेल, पण ज्यांना माहीत नाही त्यांना मी सांगू इच्छितो की फ्री फायर मध्ये पन्नास प्लेयर्सना पॅराशूटच्या मदतीने एका आयलंड वर उतरवले जाते. आणि त्या आयलंडवर सर्व प्लेयर बरोबर लढत शेवटपर्यंत टिकायचं असतं. आणि जी व्यक्ती शेवटपर्यंत मॅच खेळत असते तो त्या गेमचा विजेता ठरतो. तसेच ही गेम तुम्ही एकटे खेळू शकता किंवा चार लोकांची टीम बनवून खेळू शकता.
आणि तसंही ही गेम पब्जी सारखीच आहे. पण या गेमचे ग्राफिक्स, डिझाईन आणि फीचर्स पब्जी पासून वेगळे बनवतात. आतापर्यंत आपण फ्री फायरच्या मॅच बद्दल तर जाणून घेतलेच आहे. आता आपण जाणून घेऊया फ्री फायर ची सुरुवात कशी झाली आणि त्याला बनवले कोणी?
फ्री फायर ला कोणी बनवले (Free Fire Founder in marathi):
मित्रांनो फ्री फायर बनवणारा कोणी एक व्यक्ती नाही. याला बनवले आहे GAREENA नावाच्या कंपनीने.
खास करून या गेमचे श्रेय या कंपनीचे फाउंडर Forest Li यांना दिली जाते. Forest Li यांनी 2009 मध्ये कंपनीची स्थापना सिंगापूर येथे केली होती.Gareena ही कंपनी Gaming, Ecommerce, Esports आणि Digital Finance सारख्या सेक्टरमध्ये काम करते. Gareena ही कंपनी फ्री फायर गेम बनवण्याआधी अनेक गेम्स बनवत होती. त्यामध्ये Headshot, Fifa Online-3, Arena Of Valor, Contra Return, Free Foll आणि Leag Of Legends यांचा समावेश होतो. पण एवढे गेम्स बनवूनही Gareena कंपनीला इतकी प्रसिद्धी मिळत नव्हती. पण 2017 मध्ये जेव्हा या कंपनीने फ्री फायर गेमला मार्केटमध्ये आणले, तेव्हापासून कंपनीला एक नवीन ओळख निर्माण झाली.
फ्री फायर ची आयडिया कशी आली ( Free Fire idea in marathi):
Forest Li यांना जे Gareena कंपनीचे फाउंडर आहेत, त्यांना ही फ्री फायर गेम बनवण्याची आयडिया सुचली ती म्हणजे, पब्जी गेम 2017 पर्यंत फक्त कॉम्प्युटर आणि एक्सबॉक्स वर खेळण्यासाठी उपलब्ध होती. आणि ही गेम लोकांना खूप आवडतं होती. Forest Li यांनी त्यांची हीच आयडिया घेऊन अश्याच प्रकारची गेम मोबाईल फोन युजर्ससाठी बनवण्याचे ठरवले. हीच आयडिया घेऊन Gareena कंपनीने 111 dot studio शी मिळून फ्री फायर गेम बनवण्यास सुरुवात केली.
फ्री फायर ची सुरुवात कशी झाली (Free Fire starting Marathi):
111 dot studio शी मिळून सर्वात कमी वेळात फ्री फायर गेमचे बीटा व्हर्जन लॉंच केले गेले. आणि बीटा व्हर्जन मध्ये निघालेल्या चुका सुधारून 4 डिसेंबर 2017 ला संपूर्ण जगामध्ये अँड्रॉइड आणि आयओएस साठी फ्री फायर लॉन्च करण्यात आली. फ्री फायर गेमची आयडिया पूर्णपणे पब्जी सारखीच होती. पण Forest Li यांनी ग्राफिक्स, फिचर्स आणि डिझाइन मध्ये महत्वपूर्ण बदल केले आणि 2017 मध्ये गेम लॉन्च केल्यानंतर ही गेम 22 देशांमध्ये पहिल्या क्रमांकावर होती.
फ्री फायर ची वाढती लोकप्रियता बघून फेब्रुवारी 2018 मध्ये पब्जी ने मोबाईल साठी पब्जी मोबाईल लॉन्च केली. पण तोपर्यंत फ्री फायर लाखो लोकांच्या मोबाईल मध्ये डाउनलोड झाली होती. फ्री फायरच्या प्ले स्टोअर वर 500 मिलियन पेक्षा जास्त डाउनलोडस आहेत. तसेच त्यांची प्रतिस्पर्धी असलेल्या पब्जी गेम ची लोकप्रियता पण खूप आहे. आणि यालाही 100 मिलियन पेक्षा जास्त लोकांनी डाउनलोड केले आहे. फ्री फायर च्या लोकप्रियतेचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकाल की 2019 मध्ये सर्वात जास्त डाऊनलोड केलेल्या मोबाईल गेम मध्ये फ्री फायर चा समावेश होता. त्यांची वाढती लोकप्रियता बघून गुगल प्ले स्टोअरने 2019 मध्ये बेस्ट पॉप्युलर वर्ल्ड गेम असा अवॉर्ड फ्री फायरला दिला.
आणि शेवटी मी एवढेच म्हणेन की जेव्हा Battle Royal गेम फक्त कॉम्प्युटर आणि एक्सबॉक्स वर खेळल्या जात होत्या, तेव्हा त्या मोबाईल वर आणण्यासाठी Forest Li यांनी सुरुवात केली. आजही ही गेम इतकी खेळली जाते की करोडो गेम प्रेमी लोकांचं मन या गेमने जिंकल आहे.
अधिक माहितीसाठी तुम्ही हा व्हिडिओ सुद्धा पाहू शकता.
आशा करतो कि फ्री फायर ( Free Fire Success Story in marathi) घेऊन बद्दल तुम्हाला काही नवीन माहिती शिकायला मिळाली असेल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटुयात पुढच्या पोस्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद...