30 मराठी लाईफहॅक्स (30 Marathi Lifehacks) - Talks Marathi


नमस्कार मित्रांनो, आपलं जीवन, आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी काही टिप्सची गरज असते. आजच्या या पोस्टमध्ये आपण असेच आपल्याला उपयोगी पडणारे 30 मराठी लाईफहॅक्स (30 Marathi Lifehacks) पाहणार आहोत, चला तर मग पाहुयात. 


30 life hacks in marathi


1) फ्रिजला कोणताही विचित्र वास येत असेल तर वाटीमध्ये कोळसा घालून फ्रिजमध्ये ठेवावे. वास शोषला जातो.

2) पुलाव करताना तांदळामध्ये लिबूटम व तूप घालून भात कटावा. मोकळा व पांढटाशुभ्र होतो.

3) भजी करताना बेसन पिठात थोडे वरण घोटून घालावे. भजी कुरकुरीत होते.

4) साखरेचा किंवा गुळाचा पाक करताना त्यात थोडेसे तूप टाकावे. पाक चांगला होतो

5) रात्री झोप न येण्याची समस्या असेल तर नियमित जेवणासोबत एक वाटी दही सेवन करावे. यामुळे ही समस्या हळुहळू दूर होईल.

6) कोणत्याही पातळ भाजीत मीठ जास्त पडले असेल तर एक किंवा दोन बटाटे उकडून त्याचे काप करून भाजीत टाकावेत. भाजीचा खारटपणा कमी होईल.

7) जट तुम्हाला पोटदुखी, गॅस, अपचन असा त्रास होत असेल तर ओव्यासह काळे मीठ आणि चिमूटभर हिंग एकत्र करून खा.

8) कांद्याची साल काढून टाकल्यानंतर तो अर्धातास पाण्यात भिजत ठेवा आणि नंतर कापा यामुळे कांदा कापताना डोळ्यातून पाणी येणार नाही. 

9) मुलतानी माती पाण्यात भिजवून काही वेळ ठेवा. त्याचं मिश्रण चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचा देखील तजेलदार होते. जट आपली त्वचा तेलकट असल्यास याचा जास्त फायदा होईल.

10) हाडांच्या कमजोटीमुळे गुडघे दुखत असतील तर पपई खा पपईमधील क जीवनसत्व तुम्हाला फायदेशीर ठरेल

11) इडली मऊ बनविण्यासाठी इडलीच्या मिश्रणात साबुदाणा आणि उडीद डाळ वाटून घाला इडली मऊ बनते.

12) पालक पनीर करताना पालकाचा हिरवा रंग कायम ठेवण्यासाठी पालक शिजताना त्यात चिमूटभर खायचा सोडा टाकावा. 

13) मोड आलेली कडधान्य जास्त काळ ताजे ठेवण्यासाठी त्यामध्ये लिबाचा रस मिसळून फ्रिजमध्ये ठेवा.

14) आपण आपल्या घटात कापूट किंवा नीलगिटीचे तेल जाळले तर त्यातून निघणारा धूर घटातल्या सर्व डासांना आळा घालण्यास मदत करू शकतो.

15) समोसा बनवितांना त्या पिठात तांदळाचे थोडे पीठ घाला.समोसे कुटकुटीत होतील.

16) गरम दुधामध्ये हिंगाचे काही तुकडे घाला आणि ते प्या. त्यामुळे सर्वच आजाटांवर फायदा मिळतो. तसेच गॅसचा त्रास देखील कमी होतो.

17) काचेची भांडी बयाच दिवसानंतर काढल्यावर त्यांच्या वरील चमक कमी होते. या परिस्थितीत पाण्यात लिंबाचे साल मिसळा आणि कपड्याने भांडी पाण्यातच स्वच्छ कटा. भांडी चमकतील.

18) पुटी किंवा भजी तळताना तेलात मीठ घाला. तेल

कमी लागेल.

19) उचकी लागल्यास तळहाताच्या मध्ये प्रेशर दिल्याने आराम मिळतो. 

20) प्रवासात जट उलटीचा त्रास होत असेल तर पुदिना तेल रुमालावर घेऊन प्रवासादरम्यान सुंगत राहा. 

21) सर्दी किवा कफ यासारख्या विकारांवर हळदीयुक्त दूध अधिक फायदेशीर ठरतं. गरम दूध प्यायल्याने कप निघून जातो. दूध आणि हळद यामुळे आपल्या शटिटातील हाडे अधिक मजबूत होण्यास मदत मिळते. 

22) पायाच्या टाचांना भेगा पडत असतील तर त्या भागात कांद्याचा रस लावा यामुळे टाचा नरम आणि मुलायम बनतील. 

23) ताप आल्यावर तुळशीचा रस नंतर ताप कमी होतो. मलेटीया आणि डेंग्यू झाल्यानंतर ही तुळशीचा टस पिल्यावर आराम मिळतो. रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुळशीचा रस पिल्याने फायदा पोहचेल.

24) पॅन्टची चैन लागत नसेल किंवा त्यात गंज लागले असल्यास इयरबड ने त्या चैन वट ऑलिव्ह ऑइल लावा जेणे करून चैन व्यवस्थित काम करेल. 

25) पोहे पचायला हलके असल्यामुळे पोट पटकन भरत त्यामुळे लवकर भूक लागत नाही वजन कमी करणायांसाठी हे फायदेशीर आहेत. 

26) पुदिन्यामध्ये मेंथॉल असतो जो सर्दीवर नैसर्गिक उपचार देतो सर्दी झाल्यास पुदिन्याची पान घातलेला चहा प्या. 

27) घटात पाली येत असतील तर दाट आणि खिडक्यात लसणाच्या पाकळ्या ठेवा त्यामुळे पाली घटात शिरत नाहीत. 

28) आरोग्य व सौंदर्य रक्षणासाठी लिंबाचा रस कोमट पाण्यात मिसळून त्याने चेहटा धुवावा. कांती तेजस्वी होते आणि मुटकुत्या नाहीशा होतात. त्वचेचा रुक्षपणा निघून जातो.

29) किवी सतत आठ आठवड्यांपर्यंत खाल्ल्यास हाय बीपीच्या समस्येवर नियंत्रण मिळते. त्यामध्ये असलेले मॅग्नेशियम आणि पोटॅशियम उच्च बीपीच्या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी आहे.

30) रात्री एक ग्लास गरम दुधामध्ये एक दोन चिमूट विलायची पावडर आणि साखर टाकून घ्या यामुळे एनिमियाचे लक्षण आणि अशक्तपणापासून आराम मिळतो. 


तुम्हाला हे 30 मराठी लाईफहॅक्स (30 Marathi Lifehacks) कसे वाटले हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला उपयुक्त वाटतं असतील तर तुमच्या मित्र मैत्रिणीना पण नक्की सांगा. भेटुयात पुढच्या पोस्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद...

थोडे नवीन जरा जुने