मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य-8 | 25 Intresting Facts in Marathi - Talks Marathi
नमस्कार मित्रांनो, रोचक तथ्यच्या (25 Intresting facts in marathi) आठव्या भागात आजही आपण नवीन काही मराठी रोचक तथ्य (Rochak tathya in Marathi) जाणून घेणार आहोत. हे रोचक तथ्य तुमच्या ज्ञानामध्ये नक्कीच भर टाकतील. चला तर मग पाहूया.
1) यूएन शाश्वत विकास सोल्युशन नेटवर्कने वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट जाहीर केला आहे. यात जगातील 149 आनंदी देशांची यादी आहे. फिनलँड पुन्हा एकदा जगातील सर्वाधिक आनंदी देश ठरला आहे. तर या यादीत भारत 139 व्या स्थानी आहे. दरम्यान, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टमध्ये कोरोनाचा लोकांवर झालेला प्रभाव आणि त्यावर लोकांची मानसिकता, देशातील परिस्थिती अशा सर्व गोष्टींचा विचार करण्यात आला आहे.
2) आपल्याला झोपेत पडलेले स्वप्न हे आपणास जाग आल्यानंतर 10 मिनिटांच्या आत आपण 90 टक्के स्वप्न विसरून जातो.
3) जगभरात मधमाशांचा एकूण 20 हजार जाती आहे. मात्र त्यापैकी केवळ 4 टक्के मधमाश्या मध बनवू शकतात.
4) पृथ्वीवर सूर्यप्रकाश येण्यासाठी सुमारे 8 मिनिटे आणि 20 सेकंद लागतात.
5) जगातील 90 टक्के शुद्ध पाणी हे एकट्या अंटार्टिकामध्ये आहे.
6) तुर्कीतील प्रसिद्ध "हरी एटक आर्किटेक्चरल डिझाईन स्टुडिओ ने " कतारमध्ये एक आश्चर्यकारक 5 स्टार फ्लोटिंग हॉटेल डिजाइन केले आहे, जे वीज निर्मितीसाठी समुद्रावर तरंगत आणि फिरत राहणार आहे. हॉटेल सुमारे 35,000 चौरस मीटर क्षेत्रात तयार केले जाईल आणि यात 150 रूम असणार आहेत.
7) टॉम अँड जेरी मालिका 1940 मध्ये विल्यम आणि जोसेफ बारबेरा यांनी बनवली.
8) 2000 साली 25 मार्चला संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेल्या चलनी नाण्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले होते.
9) जपानमधील लोक सही ऐवजी स्वतःच्या स्टॅम्पचा सही म्हणून वापर करतात. या स्टॅम्पला जपानी भाषेत 'हंको' असे म्हणतात.
10) जगातील सर्वात उंच आणि जास्त लांबीची दोन्ही झाडे ही कॅलिफोर्निया देशात आहेत.
11) Apple कंपनीत नोकरी करणारा प्रत्येक चौथा माणूस भारतीय आहे.
12) शुद्ध सोने इतके मऊ असते की ते हातांनी देखील मोडले जाऊ शकते.
13) भारतातील पहिली सायबर फॉरेन्सिक लॅब त्रिपुरा येथे आहे.
14) जपानची टोयोटा आता जगातील सर्वात मौल्यवान वाहन कंपनी बनली आहे. मर्सिडीज बेंझ सर्वात मौल्यवान ऑटोमोबाईल ब्रँडच्या यादीत दुसऱ्या आणि फोक्सवगन तिसऱ्या क्रमांकावर आहे.
15) पहिला पाऊस पडल्यावर जो सुगंध येतो त्याला Petrichor म्हणतात.
16) व्हॉट्सॲप वापरणारा प्रत्येक वापरकर्ता दररोज सरासरी 23 वेळा व्हॉट्सॲप चेक करतो.
17) भारतातील पहिला सूर्योदय अरुणाचल प्रदेशच्या डोंग जिल्ह्यात होतो. डोंग जिल्हा हे भारतातील सर्वात पूर्वेकडील ठिकाण आहे, म्हणूनच येथे सूर्योदय सर्वात आधी अनुभवला जातो.
18) सिंगापूरमध्ये Chewing Gum ची आयात करणे आणि विक्री करणे बेकायदेशीर आहे. जर तुम्हाला Chewing गमसह पकडले तर आपल्यास 1,00,000 डॉलरचा दंड होऊ शकतो. सिंगापूरने Chewing गमवर बंदी घातली आहे कारण ते रस्ते आणि पदपथ गलिच्छ आणि घाण करतात.
19) आफ्रिका आणि आशिया या दोन खंडातील 90% लोकसंख्या ही ग्रामीण भागातील आहे.
20) डोळ्याचा कॉर्निया हा मानवी शरीराचा एकमेव भाग आहे ज्याला रक्तपुरवठा होत नाही. कॉर्नियाला हवेतून आणि अश्रु द्रव्यांमधून ऑक्सिजन आणि पोषक घटक मिळतात.
21) भारतीय चलनी नोटा भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे फक्त सरकारी छापखान्यातच छापल्या जातात. देशात नाशिक, देवास, म्हैसूर आणि सालबोनी (पश्चिम बंगाल) येथे छापखाने आहेत.
22) रुबिक्स क्यूब हे जगातील सर्वात जास्त विकलं जाणारं (35 कोटींहून अधिक) खेळणं आहे. विद्यार्थ्यांना त्रिमितीय भूमिती शिकवण्यासाठी एर्नो रुबिक यांनी 1980 साली याची निर्मिती केली होती.
23) दुबईत तुमच्याकडे घाणेरडी कार असल्यास तुम्हाला दंड होऊ शकतो. जर आपण कार स्वच्छ न केल्यास सरकार म्हणते की ही गोष्ट शहराच्या प्रतिमेस हानी पोहोचवू शकते. तसेच, यामुळे लोकांच्या आरोग्याला धोका पोहोचू शकते. घाणेरड्या कारच्या मालकाला 817 डॉलरचा दंड होऊ शकतो.
24) फोर्ब्सने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार अमेरिका आणि चीननंतर जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक अब्जाधीशांची संख्या भारतात आहे.
25) रतन टाटा (Ratan Tata Facts in Marathi) यांना विमाने उडवायला खूप आवडतात एवढेच नाही तर ते एक कुशल पायलट देखील आहेत. रतन टाटा 2007 मध्ये F-16 फाल्कन उडवणारे पहिले भारतीय होते.
तुम्हाला हे फॅक्ट (25 Inresting Facts in Marathi) कसे वाटले हे कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटू या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद...