मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य-7 | Intresting Facts in Marathi - Talks Marathi
नमस्कार मित्रांनो, रोचक तथ्यच्या (Marathi Intresting Facts) सातव्या भागात आजही आपण नवीन काही मराठी रोचक तथ्य (rochak tahtya marathi) जाणून घेणार आहोत. हे रोचक तथ्य तुमच्या ज्ञानामध्ये नक्कीच भर टाकतील. चला तर मग पाहूया.
1) नारायण मूर्ती (Narayan Murthy) यांनी आयआयटीची परीक्षा क्लिअर केली होती. परंतु आयआयटीला प्रवेश घेण्यासाठी त्यांच्या वडिलांकडे पैसे नव्हते, त्यामुळे त्यांनी आपल्या पत्नीचे दागिने विकून स्वतःची कंपनी सुरू केली. आज आयआयटी त्यांच्यावर केस स्टडी बनवते.
2) मधमाशीला 5 डोळे असतात. दोन मोठे डोळे आणि तीन लहान डोळे जे की, मोठ्या डोळ्यांच्या मध्यभागी असतात.
3) भारतातील सर्वात श्रीमंत भिकारी भरत जैन हा 49 वर्षाचा व्यक्ती आहे. तो इंग्लिश बोलण्यामध्ये पटाईत आहे. तो दररोज मुंबईमध्ये 8 ते 10 तास भिक्षा मागतो आणि महिन्याला 65-80 हजार रुपये कमावतो. त्याच्याकडे 70-70 लाखाचे असे दोन फ्लॅटसुद्धा आहेत.
4) कॅनडा मधील दहा वर्षाचा मुलगा ल्यूक बोल्टन ने सर्वात लांब तुटलेला दुधाचा दात 2.6 सेंटीमीटर म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपलं नाव नोंदवलं आहे. याला 2019 मध्ये एका डेंटिस्टने काढले होते.
5) गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या इंस्टाग्राम हॅण्डलने जगातील सर्वात लांब लग्नाचा ड्रेस 6,962.6 मीटरचा व्हिडिओ शेअर केला आहे. जो लांबी मध्ये 63.5 अमेरिकी फुटबॉल मैदानाच्या बरोबर आहे. हा ड्रेस साइप्रसची मारिया पारस्केवा नावाच्या महिलेने घातला होता.
6) युके मधील जेड मर्फी या युवकाने आपला चेहरा इंस्टाग्राम फिल्टर सारखा बनवण्यासाठी प्लास्टिक सर्जरी वर 30 लाख रुपये खर्च केले आहेत. अजब आहे दुनिया...
7)पृथ्वीवर सर्वात जास्त दिवस जगणारा प्राणी म्हणजे कासव. त्याचे वय साधारणतः 150 ते 200 वर्ष असते.
8) तुम्ही जर फार आधीपासून मोबाईल वापरत असाल तर 'नोकिया 1110' बद्दल तर तुम्हाला माहितीच असेल. हा फोन आजपर्यंतचा सर्वात जास्त विकला गेलेला फोन आहे. तब्ब्ल 250 दशलक्ष फोन विकून नोकियाने मोबाईल जगतात एक विक्रम नोंदवलेला आहे.
9) जगभरात सफरचंदाच्या इतक्या प्रजाती आहेत की, रोज जरी एका जातीचे सफरचंद खाल्ले तरी आपल्याला २० वर्ष जातील.
10) जगातील सर्वात प्रसिद्ध वॉलपेपर 'ब्लिस' हा चॉर्लस् रिअर यांनी १९९६ साली क्लिक केलेला आहे.
11) हवेत उड्डाण घेताना आपण आपल्या शरीरातील सुमारे 8 टक्के पाणी गमावतो. याचे कारण हवामान-नियंत्रित वातावरणातील आर्द्रता 10 ते 15 टक्क्यांपर्यंत कमी असू शकते.
12) संपूर्ण जगात दररोज १२० कोटी मॅगीची पाकिटे खाल्ली जातात, ही माहिती वाचण्यात तुम्ही जितका वेळ दिला आहे, तेवढ्या वेळात सुमारे २००० पाकिटे उघडली गेली आहेत.
13) निरमा पावडरचे निर्माते करसनभाई पटेल हे पूर्वी नौकरीवरून येता - जाता निरमा पावडर विकत. त्यांनी अपघातात मृत्यू झालेल्या आपल्या मुलीच्या निरुपमा नावावरून डिटर्जंट पावडरचे नाव निरमा असे ठेवले.
14) शालेय बसेसचा रंग पिवळा असतो कारण इतर रंगांच्या तुलनेत मानवी डोळ्यांना पिवळा रंग अधिक उठून दिसतो. हा रंग रात्री आणि धुक्यात देखील अगदी सहज दिसून येतो, जो अपघातांपासून बचाव करतो.
15) नेपाळ हा एकमेव देश असा आहे, ज्याचा राष्ट्रीय ध्वज आयताकृती नाही.
16) जगातील सर्वात ठेंगणे लोक हे इंडोनेशियात आहेत. तेथील पुरुषांची उंची सरासरी 1.58 मीटर इतकी आहे. जगातील सर्वाधिक ठेंगणे लोकांचे दुसऱ्या क्रमांकांचे ठिकाण बोलिविया हे आहे. तेथील लोकांची उंची ही 1.6 मीटर इतकी आहे. तर तिसरे ठिकाण फिलीपीन्स हे असून तेथील लोकांची उंची 1.619 मीटर इतकी आहे.
17) एका सर्व्हेनुसार, जगातील सर्वात सुशिक्षित देशांच्या यादीत कॅनडा देश पहिल्या क्रमांकावर येतो.
18) वायव्य थायलंडच्या पाडांग जमातीतील स्त्रियांची मान 7.7 इंच लांबींपर्यंत आहे. हे मानवी मानांच्या सरासरीच्या लांबीच्या दुप्पट आहे.
19) सॅमसंग ग्रुप ही दक्षिण कोरियामधील सर्वात मोठी कंपनी आहे. दक्षिण कोरियाच्या एकूण अर्थव्यवस्थेपैकी १५ टक्क्यांहून अधिक वाटा एकट्या सॅमसंगचा आहे.
20) Apple कंपनीकडे स्वतःची एक गुप्त पोलिस यंत्रणा आहे, ज्याला वर्ल्ड लॉयल्टी टीम म्हटले जाते, सुनिश्चित करतात की कोणताही कर्मचारी कंपनीची माहिती लीक करणार नाही.
तुम्हाला हे फॅक्ट (Inresting Facts in Marathi) कसे वाटले हे कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटू या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद...