सीएनजी गॅसचे फायदे आणि तोटे काय आहेत | CNG Gas advantages and disadvantages in marathi - Talks Marathi


नमस्कार मित्रांनो, आजच्या या पोस्टमध्ये आपण CNG गॅसचे फायदे आणि तोटे(CNG Gas advantages and disadvantages) जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूया...

मित्रांनो जर तुम्ही तुमच्या कारमध्ये सीएनजी गॅसचा वापर करत असाल किंवा करण्याचा विचार करत असाल तर सीएनजी गॅस चे फायदे काय आहेत अन तोटे काय आहेत हे जाणून घेणे गरजेचे आहे. हे सगळे जाणून घेतल्यानंतरच तुम्ही एक योग्य निर्णय घेऊ शकाल की आपल्या कारमध्ये सीएनजीचा वापर केला पाहिजे की नाही. जगामध्ये सीएनजीचा वापर खूप वेगाने वाढत आहे. आणि याचे मुख्य कारण आहे याचे होणारे फायदे( advantages of CNG), जे पर्यावरणाला दुसऱ्या इंधना सारखे जसे पेट्रोल डिझेलच्या तुलनेत कमी नुकसान पोहोचवतात.

या गॅस विषयी बोलायचं झालं तर सीएनजी चा फुल फॉर्म आहे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस(Compressed Natural Gas). पेट्रोल आणि डिझेल यांच्या सारख्या इंधनांच्या प्रदूषणाला पाहून सन 1930 मध्ये सीएनजी गॅस विचार आला. विदेशातही काही वर्षापासून या गॅसचा उपयोग केला जात आहे.


सीएनजी गॅसचे फायदे(Advantages of CNG in marathi):
1) सीएनजीचा सर्वात मोठा फायदा आहे स्वस्त इंधन.  हे इंधन पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत स्वस्त आहे.
2)  सीएनजीमुळे मिळणारे मायलेज पेट्रोल-डिझेलच्या तुलनेने अधिक आहे.
3) या इंधनातून निघणाऱ्या धुराचा पर्यावरणावर काहीच परिणाम किंवा नुकसान होत नाही.
4) हे इंधन वाहनाच्या इंजिनाची क्षमता वाढवते आणि त्याबरोबरच इंजिनाला स्वच्छ ठेवते.
5) सुरुवातीला सीएनजी बसवण्यासाठी थोडा खर्च येईल परंतु नंतर याचा खुप कमी खर्च येईल.
6) सीएनजी गॅस च्या उपयोगाने इंजिनाचा आवाज कमी होतो, त्यामुळे ध्वनी प्रदूषण खूप कमी होते.


सीएनजी गॅस चे तोटे (Disadvantages of CNG in marathi):
1) या गॅसचे सर्विस स्टेशन खूप कमी आहेत.  परंतु येणाऱ्या काळात त्यांची संख्या नक्कीच वाढेल.
2) कारच्या पेट्रोल किंवा डिझेल इंजिन पेक्षा सीएनजी गॅस इंजिन बनविण्याचा खर्च खूप जास्त येतो.
3) सीएनजी गॅस सिलेंडर वजनाने खूप जड असतात.
4) सीएनजी गॅसचा उपयोग करताना आपल्याला वेळेवर इंजिन ऑइल आणि एअर फिल्टर चेक करावा लागतो.

सीएनजी गॅस चे फायदे आणि तोटे (advantages and disadvantages of CNG in marathi) तर आपण जाणून घेतलेले आहेत.  तसं बघितलं तर सीएनजीच्या तोट्यापेक्षा फायदे जास्त आहेत.  जर तुम्हीसुद्धा पर्यावरण वाचवण्यासाठी योगदान देण्याचा विचार करत असाल तर सीएनजी गॅसचा वापर केला पाहिजे. त्यामुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान टळेल.

आशा करतो तुम्हाला यातून काही नॉलेज नक्कीच मिळालं असेल, जर तुम्हाला याबद्दल काही शंका, प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्की सांगा.भेटुयात पुढच्या पोस्टमध्ये तोपर्यंत
धन्यवाद...

थोडे नवीन जरा जुने