आश्चर्यकारक रोचक तथ्य भाग - 2 | Intresting facts in marathi - Talks Marathi


नमस्कार मित्रांनो, रोचक तथ्यच्या (Intresting facts in marathi) दुसऱ्या भागात आजही आपण नवीन काही मराठी रोचक तथ्य (Marathi rochak tathya) जाणून घेणार आहोत. हे रोचक तथ्य तुमच्या ज्ञानामध्ये नक्कीच भर टाकतील. चला तर मग पाहूया. 


Intresting facts in marathi


1) भारतात एकूण 33 लाख 69 हजार इतक्या लोकांकडे बंदूक ठेवण्याचा परवाना आहे. त्यातील 12 लाख 77 हजार परवाने केवळ एकट्या उत्तरप्रदेश राज्यात आहेत.

2) जगामध्ये 30% लोक अजूनही असे आहेत ज्यांनी अजूनपर्यंत मोबाईल फोन वापरला नाही.

3) सायकॉलॉजी नुसार आपण अश्या लोकांपासून जास्त आकर्षित होतो ज्यांच भेटणं आपल्यासाठी खूप अवघड असतं.

4) गरमाई नावाचा एक असा मासा आहे जो पाण्यात तरंगुही शकतो, जमिनीवर चालुही शकतो आणि हवेतही उडू शकतो.

5) ज्या डॉक्टरांनी रोगांपासून संरक्षण करण्यासाठी हात धुण्याचा मार्ग सांगितला होता, त्याला लोकांनी मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवलं होतं. अजब आहे ना दुनिया...

6) ज्या दिवशी तुमचा वाढदिवस असतो त्याच दिवशी संपूर्ण जगातील 90 लाख लोकांचाही वाढदिवस असतो.

7) स्विझरलँड मध्ये जगातील सर्वात जास्त चॉकलेट खाल्ली जातात. येथील प्रत्येक व्यक्ती एका वर्षामध्ये सरासरी 10 किलो चॉकलेट खातो.

8) रुसचे राष्ट्रपती ब्लादिमिर पुतीन गेल्या 18 वर्षापासून रूसच्या सत्तेवर आहेत, पण ते कधीच पाकिस्तानला गेले नाहीत. दक्षिण आशिया मध्ये भारत हा एकमात्र असा देश आहे जेथे पुतीन येतात. 

9) सुपरहिट भारतीय चित्रपट K.G.F या मध्ये गरुडा ही खलनायकची भूमिका साकारणारे रामचंद्रन राजू हे खऱ्या आयुष्यात K.G.F फेम अभिनेते यश यांचे पर्सनल बॉडीगार्ड आहेत.

10) एका वर्षात 15 दशलक्ष मुलींचे बालविवाह म्हणजे 18 हून कमी वय असताना लग्न लावले जाते. या आकडेवारीनुसार प्रत्येक मिनिटाला 28 मुलींचे बालविवाह होतात.

11) दुबई मध्ये एक असं ATM आहे जे पूर्णपणे 24 कॅरेट सोन्याने बनलेले आहे. यामधून पैश्याच्या जागी सोन्याचे शिक्के निघतात. हे ATM अबूधाबी मधील अमीरात पॅलेसच्या लॉबिमध्ये बसवले आहे.

12) सायकॉलॉजी सांगते एक साधारण महिला एका दिवसामध्ये जवळ जवळ नऊ वेळा आपल्या लूक बद्दल विचार करते. आणि ते आपलं एक वर्ष यामध्ये घालवतात की आज मी काय घालू?

13) जगातील सर्वात मोठा फ्लोटिंग (तरंगणारा) सौर प्रकल्प मध्यप्रदेश मधील खांडवा जिल्ह्यातील ओंकारेश्वर धरणावर बांधला जात आहे. 600 मेगावॅटचा हा प्रकल्प असून यासाठी 410 दशलक्ष डॉलर इतका खर्च येणार आहे.

14) अलीकडील एका अहवालानुसार सर्वाधिक भिकाऱ्यांची संख्या पश्चिम बंगाल राज्यात आहे. त्या पाठोपाठ उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश यांचा नंबर लागतो. 2011 च्या जनगणनेनुसार भारतात 4 लाख भिकारी आहेत.

15) बोस्टन कन्सल्टिंग समूहाच्या ताज्या अहवालानुसार जगातील सुमारे 50 टक्के लोक इतर देशांत जाऊन नोकरी करू इच्छितात. मात्र आता अशा लोकांचा श्रीमंत देश नव्हे तर लहान देशांकडे जास्त कल असल्याचे दिसते.

16) जर तुम्ही हे सत्य करून दाखवता की Paranomal Activity जसं की भूत-प्रेत खऱ्या आयुष्यामध्ये असतात. तर तुम्हाला James Randi Educational Institute एक मिलियन डॉलर बक्षीस देते.

17) आपल्या सर्वांचं आवडतं मांजर आपल्या आयुष्यातील 66 टक्के वेळ झोपण्यात घालवते.

18) शास्त्रज्ञांनी केलेल्या एका संशोधनानुसार आपल्या सर्वांच्या स्वप्नामध्ये येणारा प्रत्येक चेहरा आपण एक ना एक वेळेस पाहिलेला असतो.

19) रात्री झोपेत स्वप्ने तर आपण सर्वजण पाहतो परंतु स्वप्नामधील हे तथ्य आहे की, आपल्याला कधीच हे नाही लक्ष्यात राहत की आपलं स्वप्न सुरू कोठून झालं होत?

20) तुम्ही कधी जगातील सर्वात महाग किड्याविषयी ऐकलं आहे का? हा आहे स्टैग बीटल. ज्याची किंमत 2500$ म्हणजे जवळजवळ दोन लाख रुपये आहे.

तुम्हाला हे फॅक्ट(Marathi Intresting facts) कसे वाटले हे कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटू या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद...


थोडे नवीन जरा जुने