मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य-5 | Intresting Facts in Marathi - Talks Marathi


नमस्कार मित्रांनो, रोचक तथ्यच्या (Intresting Facts in Marathi) पाचव्या भागात आजही आपण नवीन काही मराठी रोचक तथ्य (marathi rochak tathya) जाणून घेणार आहोत. हे रोचक तथ्य तुमच्या ज्ञानामध्ये नक्कीच भर टाकतील. चला तर मग पाहूया. 


1) इंडोनेशिया या देशातील (Indoneshia facts in marathi) शाळांमध्ये एक विशेष परंपरा आहे, यामध्ये सर्व शाळकरी मुलांच्या आईना एक दिवस शाळेत आमंत्रित करतात आणि त्यांची मुले आईचे पाय धुतात."आईच्या चरणीचं आपले स्वर्ग आहे" ही भावना आणि संस्कार मुलांच्या मनात रुजवण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला जातो.

2) अमेरिकेच्या हवाई या भागातील हवाईयन संस्कृतीनुसार ज्या महिला त्यांच्या डाव्या कानात फुल अडकवतात त्या विवाहित असतात, व ज्या उजव्या कानात फुल अडकवतात त्या अविवाहित असतात.

3) एका अभ्यासातून असे लक्षात आले आहे की, घराबाहेर चपला काढणे ही भारतीयांची Concept खुपच फायदेशीर आहे. कारण चपलांमध्ये Toilet Seat पेक्षा जास्त बॅक्टेरिया असतात. त्यातील 96% बॅक्टेरिया या Fecal Bacteria असतात. ज्यांच्यामुळे वेगवेगळे आजार उदभवतात.

4) अपयशाला कंटाळून एलोन मस्कने टेस्ला कंपनी विकण्यासाठी ॲपलचे सीईओ टीम कूक यांच्याशी संपर्क केला होता. पण त्यांनी मिटिंग करायला नकार दिला.आज टेस्लाचं मार्केट कॅपिटल ८०० अब्ज डॉलर्सहून अधिक आहे. तर एलोन मस्क जगातील दुसरे सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहेत.( Elon Musk facts in marathi)

5) 70% लोकांना जुनी गाणी ऐकायला आवडतात कारण ते त्यांच्या आठवणींशी जोडलेले असतात.(Songs facts marathi)

6) एक मादी ऑक्टोपस एका वेळेस तब्बल 56000 अंडी घालते. ही अंडी परिपक्व होईपर्यंत ऑक्टोपस 6 महिने त्यांचे रक्षण करते. जन्माच्या वेळेस ऑक्टोपसची पिल्ले तांदळाच्या एका दाण्याच्या आकाराची असतात.(Octopas Facts in marathi)

7) आपण आपल्या दैनंदिन जीवनात GPS प्रणालीचा वापर कधीतरी नक्कीच करत असतो हि सेवा आपल्याला अगदी मोफत मिळते.परंतु ही सेवा ऑपरेट करण्याचा एका दिवसाचा खर्च 2 मिलियन डॉलर्स इतका आहे. हा खर्च अमेरिकेच्या टॅक्स रिव्हेन्यू मधुन दिला जातो. ही सेवा देण्यासाठी पृथ्वीच्या कक्षेत 24 सॅटेलाईट कार्यरत आहेत.

8) आळंदीतील अविनाश बोरूदिया यांच्या "रुबाब" या सलूनमध्ये चक्क 80 ग्रॅम सोन्याच्या वस्तयाने ग्राहकांची दाढी केली जाते. या वस्तऱ्याची किंमत 4 लाख रुपये असुन प्रत्येक दाढीसाठी केवळ 100 रुपये शुल्क आकारले जाते.

9) RH-null हा जगातील सर्वात दुर्लभ रक्तगट आहे. हा रक्तगट कोट्यवधींपैकी एखाद्या व्यक्तीमध्ये आढळतो. या रक्तगटाला "गोल्डन रक्तगट" असे देखील म्हणतात. जगाला या रक्तगटाची ओळख झाल्यापासून ते आत्तापर्यंत या रक्तगटाच्या केवळ 50 व्यक्तीच समोर आल्या आहेत.

10) इंद्रधनुष्य ही निसर्गाची खुपच मनमोहक कलाकृती आहे. परंतु इंद्रधनुष्याचे फोटो टिपण्याअगोदरच तो गायब होतो, परंतु चिनी तैवानच्या Yangmingshan प्रांतात 30 नोव्हेंबर 2017 रोजी तयार झालेला इंद्रधनुष्य तब्बल 8 तास 58 मिनिटे इतका वेळ तग धरून राहिला होता.याच्या नावे जगातील सर्वात जास्त वेळ टिकणारा इंद्रधनुष्य हा विक्रम नोंदवण्यात आला आहे.

11) ज्या व्यक्ती ऑनलाईन चॅटिंग करताना खुपच Expressive आणि मजेशीररित्या बोलतात परंतु प्रत्यक्ष भेटीत खुपच लाजाळू असतात अश्या व्यक्तींना "Textrovert" म्हणतात.

12) "The Invisible Jellyfish" हा पृथ्वीतळावरील सगळ्यात धोकादायक जीव आहे. हा जेलिफिश अगदी पाण्यासारखाच दिसतो आणि जेलिफिश हा कोब्रापेक्षा तब्बल 100 पटीने अधिक विषारी आहे.

13) बिबट्या वाघ हा मांजर परिवारातील एकमेव असा प्राणी आहे जो जमिनीबरोबरच पाण्यातदेखील उत्तमप्रकारे शिकार करतो. बिबट्याला पोहण्याची कला अवगत असते त्यामुळे तो मासे, कासव आणि इतर जलचर प्राण्यांचीदेखील शिकार करतो.

14) कझाकिस्तान या देशातील कलाची या गावातील लोक बहुतांश वेळेस कुठेही झोपलेले आढळतात. असे सांगितले जाते की, या गावामध्ये युरेनियम विषारी गॅस मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे येथील कधीही आणि कुठेही झोपी जातात. या गावाला "Sleepy Hollow" असे देखील म्हटले जाते.

15) जगातील 60% (3.8 अब्ज) लोक आजही सुरक्षित आणि स्वच्छ पाण्यापासून वंचित आहेत. भारतात 4 प्राथमिक शाळांमागे एका शाळेत, मुलांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय नाही. ती मुले अस्वच्छ पाणी पितात किंवा तहानलेली राहतात. भारतात दरवर्षी, पाच वर्षाखालील 7 लाख मुले, जुलाब-हगवण-डायरिया यासारख्या अशुद्ध पाण्यामुळे होणाऱ्या आजाराने मरतात.

16) सर्वात जास्त वयामध्ये बाप बनण्याच्या विश्वविक्रम हा भारतातील राजस्थान राज्यातील सुदूर गावातील रहिवासी नानु राम जोगी या व्यक्तीच्या नावावर आहे. जोगी यांनी 2007 मध्ये वयाच्या 90 व्या वर्षी आपल्या चौथ्या पत्नीपासून 21 व्या मुलाला जन्म दिला होता.

17) नेदरलँडमध्ये जर तुम्ही सायकल घेऊन ऑफिसला जात असाल तर कंपनीकडून तुम्हाला प्रत्येक किलोमीटर मागे 16 रुपये दिले जातात. वाहनांमुळे होणारे प्रदुषण टाळण्यासाठी आणि सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबविला जातो.(Netherland facts in marathi)

18) Zoom App चे Founder एरिक युआन हे अमेरिकेत राहत असताना चीनमध्ये राहणाऱ्या त्यांच्या प्रेयसीसोबत कनेक्ट राहण्यासाठी मार्ग शोधत होते त्यावेळेस त्यांना Zoom App ची कल्पना सुचली.

19) युक्रेन या देशात जर एखाद्या मुलाचा Marriage Pruposal मुलीने नाकारला तर मुलगा रिकाम्या हाताने जाऊ नये म्हणुन ती मुलगी किंवा तिचे कुटुंबीय त्या मुलाला भोपळा देतात.

20) आपल्या घरातील धुळीमध्ये खरंतर मोठ्या प्रमाणात मृत त्वचा असते. प्रत्येक तासाला मनुष्याच्या त्वचेचे 6,00,000 कण हे शरीराबाहेर पडत असतात.

तुम्हाला हे फॅक्ट (Intresting Facts in Marathi) कसे वाटले हे कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटू या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद...

थोडे नवीन जरा जुने