मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काही प्रश्न उत्तरे आजच्या या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत.
१) छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक .......... रोजी झाला.
उत्तर: ६ जून, १६७४
२) छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक …..... किल्ल्यावर झाला.
उत्तर: रायगड
३) 'राज्याभिषेक प्रयोग' हा ग्रंथ………. यांनी लिहिला.
उत्तर: गागाभट्ट
४) छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी ……. हा इंग्रज वकील हजर होता.
उत्तर: हेन्री ऑक्झिडन
५) छत्रपती शिवाजी महाराजांचे सुवर्ण सिंहासन ....... वजनाचे होते.
उत्तर: ३२ मण
६) छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानिमित्त ........... नाणे पाडले.
उत्तर: होन
७) छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकावेळी .........निर्माण केले.
उत्तर: अष्टप्रधान मंडळ
८) छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे पुरोहित .........होते.
उत्तर: गागाभट्ट
९) छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ..........रोजी झाला.
उत्तर: १९ फेब्रुवारी, १६३०
१०) "जिजाबाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची मार्गदर्शक व संरक्षक देवता होय" असे.........नी म्हटले आहे.
उत्तर: न्या.म.गो.रानडे
११) छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या भोरप्या डोंगरावर …... हा बुलंद किल्ला बांधला.
उत्तर: प्रतापगड
१२) चित्रगुप्ताच्या बखरीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जहाजांची संख्या.......होय.
उत्तर: ६४०
१३) युरोपियनांनी.......किल्ल्याला ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे संबोधले.
उत्तर: रायगड
१४) शिव कालगणनेची.........रोजी सुरुवात झाली.
उत्तर: ६ जून, १६७४
१५) छत्रपती शिवाजी महाराजांना........यांनी “भारतीय आरमाराचे जनक” असे संबोधले.
उत्तर: डॉ.बाळकृष्ण
१६) छत्रपती शिवाजी महाराजांनी........हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण उभारले.
उत्तर: तोरणा
१७) छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स.........मध्ये सुरतवर स्वारी केली.
उत्तर: १६६४
१८) शिवकालीन शिवराई नाणे ........धातूचे होते.
उत्तर: तांबा
१९) छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांना आपली आरमारी शक्ती दाखविण्यासाठी आपले सर्व आरमार........या बंदरावर आणले होते.
उत्तर: ब्याक बे
२०) कर्नाटक मोहिमेवरून…….. मध्ये छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याला दाखल झाले.
उत्तर: एप्रिल,१६७८
२१) चित्रगुप्ताच्या बखरीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची संख्या.......होय.
उत्तर: ३६१
२२) .........रोजी छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून निसटले.
उत्तर: १७ ऑगस्ट १६६६
२३) छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स.......मध्ये दाभोळ बंदरावर ताबा मिळविला.
उत्तर: १६६९
२४) शाहिस्तेखानावर छत्रपती शिवाजी महाराजांनी……. रोजी हल्ला केला.
उत्तर: ५ एप्रिल, १६६३
२५) छत्रपती शिवाजी महाराजांनी श्री शैल्य मल्लिकार्जुन येथे कृष्णा नदीवर……. घाट बांधला.
उत्तर: श्री गणेश
ही प्रश्न उत्तरे तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा. अश्याच प्रकारची माहिती दररोज जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या. भेटुयात पुढच्या पोस्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद.