मित्रांनो आपल्या सर्वांनाच आपल्या कुटुंबाची, आपल्या पाल्याची काळजी असते. यासाठी आपण खूप काही करतो. पण जेव्हा पैशाचा विषय येतो तेव्हा आपल्याला saving बद्दल आठवते. आपल्या मुलांसाठी अनेक पालक गुंतवणूक करतात. आजच्या या पोस्टमध्ये आपण लहान मुलांसाठी सर्वोत्तम गुंतवणूक योजना (The best investment plan for kids in Marathi) कोणत्या आहेत हे जाणून घेणार आहोत. 

लहान मुलांसाठी सर्वोत्तम गुंतवणूक योजना | The best investment plan for kids in Marathi


1) सुकन्या समृद्धी योजना:

मुलींसाठी सुरू करण्यात आलेली सुकन्या समृद्धी योजना ही भारत सरकारची बचत योजना आहे. या योजनेनुसार कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये मुलीचे वय 10 वर्षे होण्याआधी खाते उघडले जाऊ शकते. याचा परिपक्वता कालावधी 21 वर्षे असतो. आणि व्याजदर 7.6% असतो. 

2) सोन्यात गुंतवणूक करा:

सोन्यातील गुंतवणूक अत्यंत सुरक्षित आणि फायदेशीर समजली जाते. मार्केटमध्ये अस्थिर वातावरण असेल किंवा अडचणीच्या काळात सोनं आपल्याला मदतशीर ठरु शकते. प्रत्यक्ष सोनं खरेदी करण्यापेक्षा पालक ई-गोल्ड किंवा गोल्ड म्युच्युअल फंड यामध्ये गुंतवणूक करु शकतात.

3) इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करा:

इक्विटी म्युच्युअल फंडाच्या ठेवी मुलांसाठी गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने चांगल्या आहेत. याची दोन प्रमुख कारणे आहेत. 10-15 वर्षांची दीर्घ मुदत आणि गुंतवणूक मोड उपलब्ध, इक्विटी फंडामध्ये नेहमीच वर्षाला 12 ते 15 टक्के परतावा मिळण्याची शक्यता असते.


4) आवर्ती ठेवीच्या माध्यमातून गुंतवणूक:

मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणूक करताना पालक नेहमी कमी जोखीम असलेल्या योजनांच्या शोधात असतात. त्यामुळे पालकांनी आवर्ती ठेवींच्या बाबतीत जरूर विचार करावा. कारण यामध्ये व्याज जास्त असते. बँक आणि पोस्ट ऑफिस तुम्हाला आवर्ती ठेवींच्या बाबतीत नेहमीच चांगल्या ऑफर्स देतात.

5) पीपीएफमध्ये गुंतवणूक:

जर तुम्ही दीर्घ काळासाठी गुंतवणूक योजनेच्या विचारात असाल तर पीपीएफ निवडा. यामध्ये तुम्ही 15 वर्षांसाठी गुंतवणूक करु शकता, कमीत कमी 1 लाख रुपये वर्षाला यामध्ये गुंतवले जाऊ शकतात. यावर वर्षाला 8.75 पर्यंत व्याजही मिळू शकते. पीपीएफ खाते पोस्ट ऑफिस किंवा बँकेतही सुरु करता येतात.

6) एनएससीमध्ये गुंतवणूक:

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी) योजना तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी बचत करण्याचा सर्वोत्तम मार्ग असल्याचे सिद्ध झाले आहे. कोणत्याही पोस्ट खात्यात 5 वर्षांसाठी एनएससी काढता येते. तसेच परिपक्वता कालावधी संपला की पुन्हा यामध्ये गुंतवणूकही करता येते. तुम्ही यामध्ये कमीत कमी 100 रुपयेही गुंतवणूक करु शकता. यामध्ये 6.8 टक्के व्याजदर मिळतो.

7) ULIP योजनेत गुंतवणूक करा:

या योजनांना लोक जास्त पसंती देत नाहीत. पण कमी जोखीम घेणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ही आदर्श निवड आहे. यामध्ये वर्षाला 4 ते 6 टक्के परतावा मिळू शकतो. पण मुलांसाठीच्या बचत योजनांचा विचार करत असताना ULIP हा शेवटचा पर्याय असावा, हे लक्षात ठेवा.

तर मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण लहान मुलांसाठी सर्वोत्तम गुंतवणूक योजना (The best investment plan for kids in Marathi) जाणून घेतले. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण शेअर करा. अश्याच प्रकारची माहिती दररोज जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.
थोडे नवीन जरा जुने