होळी का साजरी केली जाते | Why celebrate Holi in marathi - Talks Marathi
होळी का साजरी केली जाते | Why celebrate Holi in marathi
होळी-रंचपंचमी हा सण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा सण आहे. होळीचा हा रंगमय सण देशभरात साजरा केला जातो.
उत्तर भारतामध्ये अतिशय उत्साहाने हा सण साजरा होतो. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही संबोधले जाते.
होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची विभागणी होते.
फाल्गुनी पौर्णिमा या दिवसापासून पंचमीपर्यंत या 5-6 दिवसांत कुठे 2 दिवस तर कुठे 5 दिवस हा उत्सव साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवरच जाणून घेऊया या सणाचे महत्व.
का साजरी करतात होळी? (Why celebrate Holi in marathi):
भारतातल्या वेगवेगळ्या भागांत फाल्गुन पौर्णिमेला एक लोकोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. ह्या उत्सवाला "होलिकादहन' किंवा 'होळी', 'शिमगा', 'हुताशनी महोत्सव', 'दोलायात्रा', 'कामदहन' अशी वेगवेगळी नावे आहेत.
ह्या लोकोत्सवाला "फाल्गुनोत्सव", आणि दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त "वसंतागमनोत्सव" किंवा "वसंतोत्सव" असेही म्हणण्यात येते.
महाराष्ट्रात होळीच्या दिवशी काही लाकडे पूजा करून जाळण्यात येतात आणि पेटलेल्या होळीभोवती 'बोंबा' मारत लोक प्रदक्षिणा घालतात.
काय आहे होळीचे महत्त्व (Importance of Holi in marathi):
होळी मनुष्याला मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी, अशी कल्पना आहे. त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते.
होळीच्या दुसर्या दिवशी वसंतोत्सवाचा प्रारंभ होतो. यात वाळलेली पाने आणि लाकडे एकत्र करून जाळणे हाच होळीचा उद्देश आहे.
दुसऱ्या दिवशी होळीच्या अग्नीत गव्हांच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. या दिवसात गव्हाचे पीक तयार होते, हे त्यामागील कारण असू शकते. नवीन पीक अग्नी देवतेला समर्पित करण्याचीही प्रथा आहे.
काय आहे आख्यायिका ( What is the story behind the Holi festival in marathi):
एका पौराणिक कथेनुसार भगवा विष्णूचा भक्त असलेल्या प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकशिपूने धाडलेल्या होलिका देवतेचा श्रीविष्णू देवाने वध केला होता.
होलिकेला वर होता की तिला अग्नी जाळू शकणार नाही, परंतु प्रल्हादाला जाळण्यासाठी तिने त्याला मांडीवर घेऊन अग्निकुंडात प्रवेश केला. प्रल्हाद बचावला व होलिकेचे दहन झाले अशी आख्यायिका प्रचलित आहे.
धन्यवाद...