मित्रांनो रोबोट हा शब्द आपण कधीतरी ऐकला असेल. अनेक चित्रपटामध्ये पाहिला सुद्धा असेल, पण तुम्हाला रोबोट बद्दल संपूर्ण माहिती नसेल. म्हणून मित्रानो आजच्या या पोस्टमध्ये आपण रोबोट म्हणजे काय (What is robot in Marathi), रोबोट काम कसं करतो (How does robot work in Marathi), रोबोट चे प्रकार (Types of robot in Marathi) याची माहिती जाणून घेणार आहोत. 

What is robot in marathi

रोबोट म्हणजे काय | रोबोट चे वेगवेगळे प्रकार | What is robot in Marathi


रोबोट म्हणजे काय (What is robot in Marathi):

रोबोट एक प्रकारची मशीन आहे, जी खासकरून कॉम्प्युटर द्वारा दिलेल्या प्रोग्राम च्या नियमानुसार काम करते. रोबोट अनेक अवघड कामे सोपे करण्यास सक्षम असतो. 

रोबोट हा मेकॅनिकल, सॉफ्टवेअर आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग च्या मिश्रणाने मिळून बनलेला असतो. यामध्ये सर्वांचं योगदान सारखच असतं. 

रोबोट ची व्याख्या (Defination of robot in Marathi):

रोबोट एक प्रकारची मशीन आहे, जी अशा प्रकारे तयार केली जाते की एकापेक्षा जास्त कामे समान गतीने आणि एकदम बरोबर करेल. 

काही रोबोट ला नियंत्रित करण्यासाठी External Control डिवाइस चा वापर केला जातो, परंतु जास्त प्रमाणात रोबोट ला नियंत्रित करण्यासाठी रोबोट मध्येच Control डिवाइस वापरले जातात. 

रोबोट चा आकार आणि size यांचं काही देणं घेणं नसतं. जो हुबेहूब माणसाप्रमाणे दिसतो त्यालाच रोबोट म्हंटले जाते ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे. रोबोट हा कोणत्याही रुपात असू शकतो. जास्त करून ते त्या कामावरून ठरवले जाते. 

समजा एखादी ऑटोमोबाईल कंपनी आहे जेथे दोन चाकी आणि चार चाकी वाहनांचे body parts बनवले जातात. यामध्ये छोट्या आणि मोठ्या पार्टस ला वेल्डिंग करून जी वस्तू समोर येते त्याला कार म्हणतात. ती काही छोट्या आणि मोठ्या पार्टस नी बनलेली असते. या छोट्या आणि मोठ्या पार्टस ला जोडायच काम कोण करतं?

होय तुम्ही बरोबर ओळखलत! रोबोट

तर आता तुम्हाला समजलं असेल की फक्त माणसाप्रमाणे दिसणाऱ्या आकृतीला रोबोट म्हणत नाहीत तर मोठं मोठ्या Automatic चालणाऱ्या मशीन ला सुद्धा रोबोट म्हणतात. चला आता आपण जाणून घेऊ या रोबोट कसं काम करतो याबद्दल. 

रोबोट चा इतिहास (History of Robot in Marathi):

वास्तविक रुपात सर्वात पहिला रोबोट बनवण्याच श्रेय स्पेरी जायरोस्कोप यांना दिलं जातं. त्यांनी सन 1913 मध्ये हा रोबोट बनवला होता. परंतु 1932 मध्ये त्यांनी तो लंडनमधील रेडिओ वरून लोकांसमोर आणला. सर्वात पहिल्यांदा 1980 मध्ये एका मोटर कार कंपनी ने 200 मजुरांना कामावरून काढून 50 रोबोट ला कामावर ठेवले होते. आणि हा रोबोट लोकांना खूपच आवडला. पूमा नावाचा हा रोबोट कारखान्यातील मशीन चे स्क्रू काढण्यासाठी वापरला जात होता. 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल:

रोबोट कसं काम करतो (How does robot work in Marathi):

रोबोट चा अर्थ तर आता तुम्हाला नक्कीच समजला असेल. रोबोट मध्ये प्रत्येक काम करण्यासाठी वेगवेगळी मशीन वापरली जाते. याचे मुख्य 5 पार्टस पडतात:
  • Structure Body
  • Sensor System
  • Muscle System
  • Power Source
  • Brain System

कोणत्याही रोबोट ला काम करण्यासाठी त्याच एक Physical Structure असतं. ज्यामध्ये एक प्रकारची मोटर सेन्सर सिस्टीम, Power देण्यासाठी Source आणि कॉम्प्युटर चा मेंदू असतो, जो पूर्ण बॉडीला नियंत्रित करतो. 

रोबोट मध्ये Piston चा वापर केला जातो ज्यामुळे रोबोटला वेगवेगळ्या दिशेला चालण्यासाठी मदत होते. रोबोट च्या मेंदूमध्ये प्रोग्राम बनवून टाकला जातो. त्यानुसारच रोबोट चा मेंदू बॉडीला नियंत्रित करतो. 

रोबोट हा लिहिलेल्या प्रोग्राम नुसारच काम करतो आणि चालतो. दुसरं काम करण्यासाठी प्रोग्राम ला परत लिहावं लागतं. सर्व रोबोट मध्ये सेन्सर नसतात. परंतु काही रोबोट मध्ये ऐकण्यासाठी, श्वास घेण्यासाठी सेन्सर लावले जातात. 

रोबोट चे प्रकार (Types of robot in Marathi):

आतापर्यंत आपल्याला समजलं असेल की रोबोट काय आहे तर आता आपण जाणून घेऊ या रोबोट च्या प्रकाराबद्दल. तस पाहायला गेलं तर रोबोट चे अनेक प्रकार पडतात, पण त्याच्या काम करण्याचा आधारावर आणि तंत्रज्ञानाच्या आधारावर त्याचे प्रकार पडतात. 

सर्वात पहिला यंत्राच्या आधारावर पडणारे रोबोट चे प्रकार पाहूया:
  1. Stationary
  2. Legged
  3. Wheeled
  4. Swimming
  5. Flying
  6. Swarm
  7. Mobile Spherical

1) Stationary Robot:

अशा प्रकारचे रोबोट एकाच जागी फिक्स्ड केलेले असतात. हे सर्व काम एकाच जागेवरून करतात. यांचं स्थान आणि हालचाल करण्याची दिशा सुद्धा ठरलेली असते. आणि हे ह्याच स्थितीत काम करण्यासाठी बनवलेले असतात. 

जसं की Welding, Drilling आणि Gripping ची कामे करणारे रोबोट stationary Robot असतात. 

2) Legged Robots:

रोबोट च्या जगतात जेव्हा चाकाचे रोबोट खूप मजबूत आणि खूप वापरले जायचे. याठिकाणी कोणतातरी वेगळा पर्याय शोधण्याचा पर्याय शास्त्रज्ञांच्या मनात आला. आणि यावर त्यांनी खूप मेहनत केली. 

चाकाचे रोबोट सिडी चढू शकत न्हवते. परंतु जर त्यांना पाय लावले तर ते चढू शकतील ही आयडिया त्यांना आली. आणि त्यामुळेच Legged Robots चा जन्म झाला. या प्रकारचे रोबोट कोणत्याही वातावरणात चालू शकतात. 

3) Wheeled Robots:

हे असे रोबोट आहेत जे चाकाच्या आधारावर चालू शकतात. या प्रकारच्या रोबोट ला बनवणे, प्रोग्रामिंग करणे आणि डिझाइन करणे खूप असतं Legged Robot च्या तुलनेने. परंतु हे फक्त सपाट पृष्ठभागावर चालू शकतात. 

4) Swimming Robots:

Robot Fish एक पाण्यात पोहणारा रोबोट आहे. ज्याची रचना आणि पोहण्याची स्टाईल माश्याप्रमाणेच असते. 1989 मध्ये MIT University ने Swimming रोबोट वर संशोधन करून सर्वांच्या समोर आणलं होत. 

5) Flying Robots:

Flying Robots हे असे रोबोट आहेत जे उडण्यामध्ये सक्षम असतात. यामध्ये लहान आकाराचे आणि बिना मानवाचे रोबोट सुद्धा येतात जे की सर्व काम करतात. या प्रकारचे रोबोट सर्च आणि Rescue मिशन मध्ये कामाला येतात. हे रोबोट कोणत्याही प्राकृतिक दुर्घटनेमध्ये अडकलेल्या लोकांना अगदी सहजपणे शोधू शकतात. 

6) Swarm Robots:

लहान लहान रोबोट मिळून जेव्हा एक मोठी सिस्टीम तयार होते ना तेव्हा त्याला Swarm Robot म्हणतात. खूप साऱ्या रोबोटची काम करण्याची क्षमता ही पर्यावरणातील वातावरणावर सुद्धा अवलंबून असते. 

7) Mobile Spherical Robots:

Spherical Robot ला Mobile Spherical रोबोट सुद्धा म्हणतात. हे सपाट पृष्ठभागावर एकदम उडी मारून हालचाल करतात. 

आता आपण जाणून घेऊ या रोबोट च्या काम करण्याच्या आधारावर पडणारे प्रकार:
  1. Domestic Robots
  2. Medical Robots
  3. Military Robots
  4. Space Robots
  5. Industrial Robots

1) Domestic Robots:

हे रोबोट घरामध्ये वापरले जातात. जसं की vacuum cleaners, sweepers, gutter cleaners इत्यादी. 

2) Medical Robots:

मेडिकल जगतात याचा वापर सर्वात जास्त केला जातो. आजकाल रोबोट च्या मदतीने डॉक्टर कृत्रिम रोबोटिक्स हातांचा वापर करून ऑपरेशन करतात. आणि मेडिकल जगतात यामुळे नवी क्रांती आली आहे. कारण यामुळे डॉक्टर दूर असूनसुद्धा लोकांचा जीव वाचवू शकतात. 

3) Military Robots:

Military साठी रोबोट खूप महत्वाची भूमिका बजावतात. हे सुरक्षेसाठी सुद्धा कामाला येतात. हे रोबोट अशा ठिकाणी अगदी सहजपणे जातात जेथे माणसाचं जाणं खूप कठीण असतं. हे रोबोट कोणत्याही ठिकाणी जाऊन शत्रूच ठिकाण शोधण्यास मदत करतात. 

4) Space Robots:

International Space Station मध्ये अनेक कामे रोबोट च्या मदतीने केली जातात. मंगळ ग्रहावर सुद्धा Rover नावाचं रोबोट पाठवलं गेलं होत. 

5) Industrial Robots:

आज जगामध्ये प्रत्येक भागात दरोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या वस्तू बनवल्या जातात. प्रत्येक प्रकारच्या खाण्याच्या वस्तू, घालण्यासाठी लागणारे कपडे, गाडी सारख्या गोष्टी ज्या इंडस्ट्री मध्ये बनवल्या जातात. आणि या इंडस्ट्री मध्ये सुद्धा रोबोट चा वापर केला जातो. 

आज आपण काय शिकलो:

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण रोबोट म्हणजे काय, रोबोट काय आहे, रोबोट काम कसं करतो आणि रोबोट चे प्रकार कोणते आहेत याची माहिती जाणून घेतली. 

तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण शेअर करा. आणि अश्याच प्रकारची माहिती दररोज जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या. भेटुयात पुढच्या पोस्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद. 

थोडे नवीन जरा जुने