मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य-11 | 40 Intresting Facts in Marathi - Talks Marathi
नमस्कार मित्रांनो, रोचक तथ्यच्या (40 Intresting facts in marathi) अकराव्या भागात आजही आपण नवीन काही मराठी रोचक तथ्य (Rochak tathya in Marathi) जाणून घेणार आहोत. हे रोचक तथ्य तुमच्या ज्ञानामध्ये नक्कीच भर टाकतील. चला तर मग पाहूया.
1) जगात नॉर्थ कोरिया आणि कुबा असे दोनच देश आहेत जिथे कोका-कोलाची खरेदी किंवा विक्री होत नाही.
2) भारत सरकार एका 2000 रुपयांच्या नोटा बनवायला 4.18 रुपये खर्च करते. प्रत्येक 500 रुपयांच्या नोटच्या छपाईची किंमत 2.57 रुपये आहे आणि 100 रुपयांच्या नोटसाठी 1.51 रुपये आहे.
3) उरुग्वे या देशाचे पंतप्रधान जगातील सर्वात गरीब पंतप्रधान आहेत त्यांच्या उत्पन्नाच्या 90 टक्के ते गरीब विद्यार्थ्यांनच्या शिक्षणाकरिता खर्च करतात आणि स्वतः एका छोट्याश्या घरात राहतात.
4) जवळपास 75 हजार फुले तोडल्यानंतर त्या पासून एक पौंड ( 453 ग्राम ) केशर मिळते याचमुळे केशर महाग मिळते.
5) निवडणुकीत ही वापरली जाणारी शाई ही कर्नाटकातील म्हैसूर येथे तयार होऊन देशात व विदेशात या शाईचा पुरवठा केला जातो.
6) न्यूझीलंड या देशामध्ये मेंढ्यांची संख्या ही तेथील नागरिकांपेक्षा अधिक आहे तेथे मेंढ्यांची संख्या 70 दशलक्ष आहे व तेथील नागरिकांची संख्या 4 दशलक्ष.
7) सफरचंद पाण्यावर तरंगतात कारण त्यामध्ये 25% टक्के हवा असते!
8) जगातील सर्वात मोठी TV जाहिरात (Tv commerial) ही तब्बल 14 तासाची होती आणि ही जाहिरात एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे, ही जाहिरात woohoo ह्या चॅनेल वर 8 डिसेंबर 2018 रोजी प्रसारित केली गेली होती.
9) स्वीडनमधील जुक्कासजर्वी नावाच्या छोट्या गावात बांधलेल 'आईस हॉटेल 365' हे असं हॉटेल आहे की तेथील बर्फ कधीही वितळत नाही. या 2100 चौरस मीटर बर्फाच्या हॉटेलमध्ये एक आइस बार आहे आणि एक अनुभव कक्ष आहे जिथे आपल्याला चित्रे, कला दाखवली जातात.
10) Dermatographia ही अशी मेडिकल कंडिशन आहे की ज्या मध्ये व्यक्ती च्या त्वचे वर हलकंस जरी स्क्रॅच केलं तरी, तेव्हा अंगावर उठणाऱ्या पित्ताच्या गाठीसारखेच खरुज लाल खुणा पडतात. ह्या खुणा सहसा 30 मिनिटांत अदृश्य होतात.
11) Svalbard Global Seed Vault, नॉर्वेमध्ये भूमिगत तिजोरी बनवण्यात आली असून, ज्यामध्ये जगातील सर्व पिकांच्या बिया ठेवल्या जातात, जेणेकरून भविष्यात जगातील सर्व पिके काही कारणास्तव खराब झाल्यास येथून बियाणे घेता येऊ शकतात.
12) जगातील सर्वांत महाग दात हा आयझॅक न्यूटन यांचा आहे. 1816 मध्ये त्यांचा हा दात 3633 डॉलर ला विकला गेला होता जे की आजच्या हिशोबाने 36000 डॉलर इतके आहेत.
13) सर्वप्रथम कॅशलेस सिस्टम स्वीडनमध्ये वापर सुरू झाला आणि नंतर जगभर वापरला जाऊ लागला.
14) दात हा शरीराचा असा एकमेव भाग की स्वत: ला कधी ही ठीक करू शकत नाही.
15) पेंग्विन खारं पाणी पिऊ शकतात. त्यामुळे त्यांना मर्यादित गोडं पाणी असलेल्या प्रदेशात जगण्यास मदत होते.
16) 1912 मध्ये टायटॅनिक जहाज बुडाल्यामुळे सुमारे 1500 लोक मरण पावले. पण जहाज बुडल्यानंतरही एक बिस्किट वाचला, जो नुकताच लिलावात 15 लाख भारतीय रुपयांना विकला. ही आतापर्यंतची सर्वाधिक विक्री होणारा महाग बिस्किट आहे.
17) गुजरातमधील नीलांशी पटेल ही जगातील सर्वात लांब केसांची लहान वयाची मुलगी म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवलं गेलं आहे. तिने 12 वर्षानंतर पहिल्यांदा केस कापले आहेत. गेल्यावर्षी तिच्या 18 व्या वाढदिवसाच्या वेळी तिच्या केसांची लांबी 200 मीटर इतकी मोजली गेली होती.
18) डेरियस हा जगातील सर्वात मोठा ससा म्हणून त्याचं नाव गिनीज वर्ल्ड बुक ऑफ वर्ल्ड रेकोर्डमध्ये नोंद आहे. इंग्लडमधील माजी मॉडेल अॅनेट एडवर्ड्स ही त्याची मालकीण आहे. हा ससा 4 फूट 4 इंच इतका मोठा आहे.
19) जपानच्या तैसीरोजिम्मा नावाच्या बेटाला कॅट आयलंड म्हणटले जाते, कारण ह्या बेटावर जर 100 लोक राहत असतील, तर 400 मांजर राहतात. विशेष म्हणजे ह्या बेटावर कुत्र्यांना न्यायला बंदी आहे.
20) फ्रान्स हा एक असा देश आहे जिथे एखाद्या मुलीला एखाद्या मुलाने 14 सेकंद पाहिले किंवा तिच्याबद्दल काही चुकीचे वक्तव्य केले तर त्या मुलाला 60 हजार रुपयांचा दंड बसू शकतो.
21) आपल्या शरीरात सुमारे 0.2 मिलीग्राम सोने आहे आणि त्यातील सर्वाधिक प्रमाण रक्तामध्ये आढळते. 40,000 लोकांच्या रक्तातून 8 ग्रॅम सोने काढले जाऊ शकते.
22) शिंकताना आपल्या हृदयाचे ठोके एक मिली सेकंदासाठी बंद होतात.
23) भारतातील काही भागात गुलाबी हत्ती आढळून येतात. हत्ती किड्यांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी स्वतः अंगावर लाल माती टाकतात त्यामुळे त्यांचा रंग गुलाबी होतो.
24) "बॉटोक्स" हा जगातील सर्वात खतरनाक विष मानला जातो. या विषाची केवळ 4 ग्रॅम इतकी मात्रा पृथ्वीवरील संपूर्ण मानवजातीचा सर्वनाश करू शकते.
25) जेव्हा आपण रात्रभर झोप घेऊन सकाळी झोपेतून उठण्याआधी तुमची उंची 1 सेंटीमीटर वाढलेली असते. असे अशामुळे होते की, दिवसा तुमच्या हाडांमध सॉफ्ट कार्टिलेज हे संकुचित होत असते.
26) गणितज्ज्ञांच्या एका समुहाने जाहीर केलेल्या माहितीनुसार एका सामान्य Tie ला 1,77,147 वेगवेगळ्या प्रकारे बांधले जाऊ शकते.
27) संशोधकांच्या मते, स्वतःला 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ आरशात पाहिल्याने माणसाचा चिंतातूरपणा वाढतो.
28) मानवाचे डोळे एका मिनिटात 17 वेळा, एका दिवसात 14 हजार 280 तर एका वर्षात 52 लाख वेळा उघडझाप करतात.
29) भारतातील नवापूर रेल्वे स्टेशन हे एकमेव असे स्टेशन आहे ज्याचा अर्धा भाग महाराष्ट्रात आणि अर्धा भाग गुजरात राज्याच्या सीमेमध्ये येते.
30) जेव्हा मायक्रोवेव्हचा शोध लागला, तेव्हा त्यात प्रथम शिजवलेले पदार्थ पॉपकॉर्न होते!
31) रिलायन्स कंपनी आंबा सुद्धा विकते. रिलायन्स इंडस्ट्री जगातील सर्वात मोठी आंबा निर्यात करणारी कंपनी आहे.
32) ज्या गतीने आपल्या हाताची नखे वाढतात त्याच गतीने चंद्र पृथ्वीपासून दूर जात आहे.
33) मानवी शरीर एखादी कार उचलण्या इतपत सक्षम असते, परंतु हे करण्यापासून आपला मेंदु आपल्याला थांबवत असतो.
34) जगातील सर्वात पहिली सेल्फी 1839 मध्ये रॉबर्ट कार्नेलियस या व्यक्तीने घेतली होती.
35) ऑडी कारच्या लोगो मधील चार रिंग्स या चार वेगवेगळ्या कंपनीला रिप्रेजेंट करतात. यातील पहिली रिंग स्वतः ऑडी कंपनीची, दुसरी DKW या कंपनीची, तिसरी HORCH तर चौथी रिंग WANDERER या कंपनीला रेप्रेजेंट करते.
36) अमेलिया अरहर्ट ह्या अटलांटिक महासगरावरून एकट्या विमानाने उडणाऱ्या पहिल्या अमेरिकन महिला होत्या. त्यांनी अजूनही खूप रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले होते. 1937 मध्ये सेंट्रल पॅसिफिक महासगरावरून उडताना त्यांचे विमान रहस्यमयीरित्या गायब झाले व कधीच सापडले देखील नाही.
37) आफ्रिकाच्या उत्तर-पश्चिम नामिबिया प्रांतात कुणाईन प्रांतात राहणाऱ्या हिम्बा जमातीच्या स्त्रिया लग्न झाल्यानंतर त्यांच्या जीवनात एकदा फक्त अंघोळ करतात.
38) वालमार्ट (Walmart) 2 जुलै 1992 ला सुरु झालं होतं, तेव्हा त्याची 1 वर्षाची कमाई $975,000 इतकी होती आणि आज हीच कंपनी मिनिटाला सुमारे $982,000 कमवते.
39) अमेरिकेच्या सिएटल मध्ये गम वॉल म्हणून एक भिंत आहे या भिंतीवर लोकांनी खाल्लेले च्युंगम चिटकव तुम्हाला दिसतील. खरं तर ही चिटकवण्याची प्रथा 1993 पासून चालत आलेली आहे
40) iceland असा एकमेव देश आहे की जिथं मच्छर, साप, आणि सरपटणारे प्राणी नाहीत, आणि तिथं मोजक्याच जातीचे स्पायडर (कोळी) सापडतात.
तुम्हाला हे फॅक्ट (40 Inresting Facts in Marathi) कसे वाटले हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण शेअर करा. भेटूया पुढच्या पोस्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद...